Share Market sakal
Share Market

Share Market : निर्देशांक तेजीच्या लाटेवर स्वार; निफ्टी १७ हजारांवर सेन्सेक्स ५८ हजारांजवळ

अमेरिकेतील फर्स्ट रिपब्लिक बँकेला अर्थसाह्य मिळाल्याने आज जागतिक शेअर बाजारांमध्ये आलेल्या तेजीच्या लाटेवर स्वार होऊन भारतीय शेअर बाजार निर्देशांक देखील अर्धा टक्क्यांपेक्षा जास्त वाढले.

सकाळ वृत्तसेवा

अमेरिकेतील फर्स्ट रिपब्लिक बँकेला अर्थसाह्य मिळाल्याने आज जागतिक शेअर बाजारांमध्ये आलेल्या तेजीच्या लाटेवर स्वार होऊन भारतीय शेअर बाजार निर्देशांक देखील अर्धा टक्क्यांपेक्षा जास्त वाढले.

मुंबई - अमेरिकेतील फर्स्ट रिपब्लिक बँकेला अर्थसाह्य मिळाल्याने आज जागतिक शेअर बाजारांमध्ये आलेल्या तेजीच्या लाटेवर स्वार होऊन भारतीय शेअर बाजार निर्देशांक देखील अर्धा टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. यामुळे ११४.४५ अंश वाढलेला निफ्टी १७ हजारांच्या वर गेला तर ३५५.०६ अंश वाढलेला सेन्सेक्स ५८ हजारांच्या जवळ पोहोचला.

निर्देशांकांची आजची सलग दुसरी तेजी आहे. अमेरिकेतील अडचणीत आलेल्या बँकेला अर्थसाह्य मिळण्यासोबतच विशेष प्रकारच्या स्टील उत्पादनावर आधारित प्रोत्साहन देण्याच्या योजनेचा दुसरा टप्पा सरकारने जारी केल्यामुळे पोलाद निर्मिती कंपन्यांच्या शेअरचे भावही आज वाढले. या सर्व वातावरणामुळे आज धातुनिर्मिती कंपन्या, बँका, आयटी आणि बांधकाम व्यवसाय कंपन्यांचे शेअर वाढले.

आज भारतीय शेअर बाजारात सुरुवात चांगली झाली. मध्यंतरी थोडा काळ नफावसुली झाली, मात्र पुन्हा दुपारनंतर पुन्हा तेजीने जोर पकडल्याने निर्देशांक नफ्यातच बंद झाले. दिवसअखेरीस सेन्सेक्स ५७,९८९.९० अंशावर तर निफ्टी १७,१००.०५ अंशावर बंद झाला.

क्रेडिट स्युईसच्या मागोमाग अमेरिकेतील फर्स्ट रिपब्लिकन बँकेलाही अमेरिकेतील चार मोठ्या बँकांच्या समूहाने ३० अब्ज डॉलरचे सहाय्य केल्याच्या वृत्तामुळे आज जागतिक शेअर बाजारात तेजी परतली होती. तर अमेरिकेतील आर्थिक आकडे खराब आल्यामुळे तेथे फारशी व्याज दरवाढ होणार नाही अशी अपेक्षाही वर्तवली जात होती.

वाहन निर्मिती, संरक्षण आणि औद्योगिक उत्पादनासाठी लागणाऱ्या विशेष प्रकारच्या स्टील उत्पादनासाठी सरकारने दुसरी पीएलआय योजना आणली असून आज त्यात २७ स्टील कंपन्यांनी सरकारशी ५७ करार केले. त्यामुळे टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया या शेअरचे भाव बी.एस.ई. वर वाढले होते.

आज निफ्टीच्या मुख्य ५० पैकी ३७ शेअरचे भाव वाढले. तर सेन्सेक्सच्या प्रमुख ३० पैकी २१ शेअरचे भाव वाढले. आज निफ्टी अल्पकाळ सतरा हजाराच्या खाली होता, एरवी तो दिवसभर सतरा हजाराच्या वरच फिरत होता. तर सेन्सेक्स आज काही काळ ५८ हजारांच्या वर गेला होता. मात्र तो तेथे टिकू शकला नाही, पण आता तो ५८ हजाराच्या घरात आला आहे.

निफ्टी मधील एचसीएल टेक, हिंदाल्को, अल्ट्राटेक सिमेंट, यूपीएल, जेएसडब्ल्यू स्टील या शेअरचे भाव दोन ते चार टक्के वाढले. तर सेन्सेक्स मधील नेसले, टाटा स्टील, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, एअरटेल, एचडीएफसी, इन्फोसिस, लार्सन अँड टुब्रो, विप्रो या शेअरचे भाव एक ते सव्वा दोन टक्के वाढले.

अमेरिकेची आर्थिक आकडेवारी खराब आल्यामुळे कमी व्याज दरवाढीच्या अपेक्षेत तेजी शक्य आहे. मात्र शेअरबाजार अजूनही फार मजबूत वाटत नसल्यामुळे काळजी घेणे अपेक्षित आहे.

- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT