gautam adani mukesh ambani Sakal
Share Market

Bankruptcy: देशातील सर्वात मोठी रिटेलर कंपनी विकत घेण्याच्या शर्यतीत अंबानी-अदानी, NCLT ने...

49 गुंतवणूकदारांनी कंपनी खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे.

राहुल शेळके

Future Retail: गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला तोंड देत असलेल्या फ्युचर रिटेल लिमिटेड (Future Retail) खरेदी करण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) दाखल केला आहे.

या दोन उद्योगपतींसह 49 कंपन्या गुंतवणूकदारांनीही फ्युचर रिटेल लिमिटेड खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने कंपनीची कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया (CIRP) पूर्ण करण्यासाठी फ्युचर रिटेलला आणखी 90 दिवसांचा अवधी दिला आहे.

15 जुलैपर्यंत मुदत वाढवली :

NCLT च्या मुंबई खंडपीठाने फ्युचर रिटेल लिमिटेडची याचिका स्वीकारून 15 जुलै 2023 पर्यंत मुदत वाढवली आहे. फ्युचर रिटेलच्या शेअर्समधील व्यवहार थांबले आहेत. यापूर्वी शेअरची किंमत 2.83 रुपये होती.

याआधी एकदा कंपनीची लिलाव प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र नंतर ती पूर्ण होऊ शकली नाही. आता पुन्हा एकदा विक्रीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी 49 आघाडीच्या व्यावसायिक समूहांनी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) दाखल केले आहेत.

शर्यतीत 49 खरेदीदार :

किशोर बियाणी यांच्या बिग बाजार फर्म फ्यूचर रिटेलसाठी नवीन एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) बाहेर आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 49 खरेदीदारांनी यात रस दाखवला आहे.

यामध्ये डब्ल्यूएच स्मिथ, जिंदाल पॉवर लिमिटेड, रिलायन्स रिटेल , अदानी ग्रुप या व्यतिरिक्त गार्डन ब्रदर्सचा आंतरराष्ट्रीय संघ जेसी फ्लॉवर्स यांचा समावेश आहे.

कर्जाचा बोजा किती?

गेल्या वर्षी 2022 मध्ये, फ्यूचर रिटेल आणि मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेलमधील करार पूर्ण होणार होता, परंतु अॅमेझॉनच्या विरोधानंतर हा करार झाला नाही आणि रिलायन्सने माघार घेतली.

मात्र आता पुन्हा दिवाळखोर कंपनी विकत घेण्याची स्पर्धा लागली आहे. फ्युचर ग्रुप ही एकेकाळी देशातील दुसरी सर्वात मोठी रिटेलर फर्म होती. बिग बाजारची कंपनी फ्युचर रिटेलवर विविध कर्जदारांचे 21,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT