Nifty 50 touches new all-time high, extends gain for 5th day in a row  Sakal
Share Market

Nifty At All-Time High: शेअर बाजाराचा नवा विक्रम! निफ्टी-50 नवीन उच्चांकावर; सलग पाचव्या दिवशी वाढ

Nifty At All-Time High: भारतातील आघाडीच्या 50 कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या निफ्टी-50 ने आज सलग पाचव्या ट्रेडिंग सत्रात तेजीचा कल कायम ठेवला आणि 22,157.90 अंकांचा नवा उच्चांक गाठला. गेल्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टी-50मध्ये सुमारे 2 टक्के वाढ झाली.

राहुल शेळके

Nifty At All-Time High: भारतातील आघाडीच्या 50 कंपन्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या निफ्टी-50 ने आज सलग पाचव्या ट्रेडिंग सत्रात तेजीचा कल कायम ठेवला आणि निफ्टीने 22,157.90 अंकांचा नवा उच्चांक गाठला.

आजच्या तेजीमध्ये NSE वर कंपन्यांचे मार्केट कॅप (Mcap) 4.65 ट्रिलियन डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचले. गेल्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टी-50मध्ये सुमारे 2 टक्के वाढ झाली. (Nifty 50 touches new all-time high, extends gain for 5th day in a row)

सात कंपन्यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर

आजच्या ट्रेडिंग सत्रात बजाज ऑटो, अदानी एंटरप्रायझेस, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, मारुती सुझुकी इंडिया, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, विप्रो आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनीसह सात कंपन्यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर पोहोचले.

टॉप गेनर्समध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, बजाज ऑटो, अदानी एंटरप्रायझेस, भारती एअरटेल, आयटीसी, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि आयसीआयसीआय बँक हे शेअर्स 1.5 ते 2.8 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत.

निफ्टी-50 फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत 410 अंकांनी वाढला आहे

फेब्रुवारी 2024 मध्ये आतापर्यंत निफ्टी-50 निर्देशांक 410 अंकांनी किंवा 1.92 टक्क्यांनी वाढला आहे. शिवाय, निर्देशांक मार्च 2023 च्या 16,828 च्या नीचांकावरून 31.60 टक्क्यांनी वाढला आहे.

दुसरीकडे, दुपारी 1:15 पर्यंत, निफ्टी स्मॉल कॅप 100 इंडेक्स आणि निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्स दोन्ही अनुक्रमे 0.69% आणि 0.69% च्या वाढीसह व्यवहार करत आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT