Nova Agritech IPO Sakal
Share Market

Nova Agritech IPO: ग्रे मार्केटमध्ये शेअर्स तेजीत; पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या सर्व तपशील

Nova AgriTech IPO: हैदराबादस्थित कंपनी नोवा एग्रीटेकचा (Nova Agritech) आयपीओ आज 23 जानेवारीला सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. यामध्ये तुम्हाला 25 जानेवारीपर्यंत बोली लावता येईल. या आयपीओसाठीचा प्राइस बँड 39 ते 41 रुपये निश्चित करण्यात आला आहे.

राहुल शेळके

Nova AgriTech IPO: हैदराबादस्थित कंपनी नोवा एग्रीटेकचा (Nova Agritech) आयपीओ आज 23 जानेवारीला सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. यामध्ये तुम्हाला 25 जानेवारीपर्यंत बोली लावता येईल. या आयपीओसाठीचा प्राइस बँड 39 ते 41 रुपये निश्चित करण्यात आला आहे.

नोवा एग्रीटेकच्या आयपीओमध्ये नूतलापती व्यंकटसुब्बाराव यांनी ऑफर फॉर सेलद्वारे 77.58 लाख इक्विटी शेअर्सच्या विक्रीसह 112 कोटीचे नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत.

व्यंकटसुब्बाराव हे कंपनीचे एकमेव पब्लिक शेअरहोल्डर आहेत. ते ओएफएसमधील संपूर्ण वैयक्तिक शेअरहोल्डिंग विकून कंपनीतून बाहेर पडतील. नोवा ऍग्रीटेकमध्ये प्रमोटर्सकडे 84.27 टक्के हिस्सा आहे. कीनोट फायनान्शियल सर्व्हिसेस आणि बजाज कॅपिटल हे आयपीओसाठी मर्चंट बँकर आहेत.

कंपनीने आयपीओमधील अर्धा हिस्सा क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्ससाठी, 15 टक्के नॉन-इंस्टीट्यूशनल इनवेस्टर्ससाठी आणि 35 टक्के रिटेल इनवेस्टर्ससाठी राखीव ठेवला आहे. नोवा एग्रीटेकस 30 जानेवारीला बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होईल.

नोवा ऍग्रीटेकने गेल्या काही वर्षांत चांगली आर्थिक कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंसोलिडेटेड बेसिसवर कंपनीचा निव्वळ नफा 49.7 टक्क्यांनी वाढून 20.5 कोटी झाला आहे. तर महसूल 13.4 टक्क्यांनी वाढून 210.6 कोटी झाला आहे.

नोवा ऍग्रीटेचा एबिटदा वार्षिक 39.3 टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष 2023 मध्ये 38.7 कोटी झाला. आर्थिक वर्ष 2024 च्या एप्रिल-सप्टेंबर कालावधीत, कंपनीने कंसोलिडेटेड बेसिसवर 103.22 कोटीचा महसूल आणि 10.4 कोटीचा निव्वळ नफा कमावला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT