Share Market sakal
Share Market

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्सने 200 अंकांवर तर निफ्टी 19400 वर, 'या' शेअर्समध्ये दमदार तेजी

शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्सने 200 अंकांनी वाढला तर निफ्टी 19400 वर

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या आठवड्यात उच्च पातळी गाठल्यानंतर आज शेअर बाजाराने नवीन आठवड्याची सुरुवात चांगली केली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने दमदार सुरवात केली आहे. सेन्सेक्सने 200 अंकांची उसळी घेतली आहे. तर निफ्टी 19400 च्या जवळ पोहोचला आहे. आज आठवड्याची सुरवात गुंतवणूकदारांसाठी फायद्याची ठरण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

शुक्रवारी दोन्ही निर्देशांक तोट्यात बंद झाले होते. सेन्सेक्स सुमारे 0.90 टक्क्यांच्या घसरणीसह 65,300 अंकांच्या खाली बंद झाला होता. तर निफ्टी जवळपास 165 अंकांच्या घसरणीसह 19,332 अंकांच्या जवळ बंद झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी नवीन विक्रमी उच्चांकी पातळी गाठली होती.(Latest Marathi News)

सेन्सेक्समधील बहुतांश कंपन्यांचे शेअर्स नफ्यात दिसून येत आहेत. सकाळी 09:20 वाजता सेन्सेक्समधील 30 पैकी 16 कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये होते, तर 14 कंपन्यांचे शेअर्स तोट्यात व्यवहार करत होते. (Latest Marathi News)

आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात नेस्ले, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारखे शेअर्स वधारत आहेत. दुसरीकडे, एचसीएल टेक, पॉवरग्रीड, टायटन यांसारखे शेअर्स तोट्यात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT