Pharma Stock sakal
Share Market

Pharma Stock : या फार्मा स्टॉकबाबत एक्सपर्ट सकारात्मक, तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?

या स्मॉलकॅप फार्मा कंपनीचे शेअर्स पुढील दोन ते तीन तिमाहीत 10 टक्के नफा देऊ शकतात

सकाळ डिजिटल टीम

Marksans Pharma : फार्मा सेक्टरमधील कंपनी मार्कसन्स फार्माचे ( Marksans Pharma) शेअर्स यावर्षी 16 टक्क्यांनी वाढले आहेत. या स्मॉलकॅप फार्मा कंपनीचे शेअर्स पुढील दोन ते तीन तिमाहीत 10 टक्के नफा देऊ शकतात असा विश्वास ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजला आहे.

त्याचे शेअर्स सध्या बीएसईवर 2.44 टक्क्यांनी वाढून 68.39 रुपयांवर ट्रेड करत आहेत. त्यांची मार्केट कॅप 3,099.19 कोटी आहे. (Pharma Stock Marksans Pharma are in growth read what expert said )

मार्कसन्स फार्माचा फोकस यूएस आणि यूके मार्केटवर आहे. याशिवाय, ते हाय मार्जिन सॉफ्टजेल्स आणि ओव्हर-द-काउंटर (OTC) प्रॉडक्ट्सवरही जास्त फोकस करत आहेत. यामुळे ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीज याबाबत खूप सकारात्मक आहे.

कंपनीकडे मजबूत बॅलेन्सशीट आहे, जो नवीन ड्रग एप्लीिकेशन्स, प्रॉडक्ट लायसन्स आणि कॅपिसिटीजद्वारे इनऑर्गेनिक ग्रोथला सपोर्ट देईल.

कंपनीचा बॅकवर्ड इंटिग्रेशनवर फोकस असल्याने येत्या तिमाहीत ऑपरेटिंग मार्जिन सुधारेल. ऍक्टिव्ह फार्मा इंग्रिडियंट्स (API) बिझनेसमधील बॅकवर्ड इंटिग्रेशन तसेच ओव्हर-द-काउंटर आणि प्रिस्क्रिप्शन या दोन्ही सेगमेंट्सुळे मार्जिन सुधारण्याची आशा आहे.

याशिवाय, कंपनीने ऍक्सेस हेल्थकेअर विकत घेतले आहे, जे उत्तर आफ्रिकेत आहे. कंपनीच्या फ्रंट-एंड सेल्स आणि मार्केटींग इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून, कंपनी भारतातील प्रॉडक्ट्स यूके, यूएस, मिडस-इस्ट आणि उत्तर आफ्रिकेला विकू शकते.

फार्मा ब्रोकरेज एचडीएफसी सिक्युरिटीजने मार्कसन्स फार्मावर 68.80-69.50 च्या प्राइस बँडमध्ये खरेदीची शिफारस केली आहे. जर त्याचे शेअर्स आणखी खाली आले तर शेअर्सची संख्या 59.50 रुपयांपर्यंत वाढवता येईल. मार्कसन्स फार्माचे शेअर्स पुढील दोन ते तीन तिमाहीत टारगेट गाठू शकतात असा विश्वास ब्रोकरेजला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Rest House: बेड, फ्रिज, आरओ अन्... भारतीय रेल्वेची मोठी भेट; आधुनिक विश्रामगृह सुरू

दोन वर्षातून १ चित्रपट तरीही कोट्यवधींचा मालक आहे सलमान खान; कुठून होते अभिनेत्याची कमाई, वाचा साइड बिझनेसचं गणित

Kothrud News : कोथरूडमध्ये एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप!

'धुरंधर'च्या यशामध्ये खऱ्या रहमान डकैतच्या मयतीचा व्हिडिओ व्हायरल; एन्काउंटरनंतर अशी होती परिस्थिती, मृतदेहाजवळ...

Latest Marathi News Live Update : ३०० लोक रद्द, पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेसाठी शनिवारी कामे

SCROLL FOR NEXT