piramal pharma share price surges 8 percent as company swings into profit  Sakal
Share Market

Piramal Pharma Share: पिरॅमल फार्माच्या शेअर्समध्ये तेजी, कंपनीने दुसऱ्या तिमाहीत मिळवला दमदार नफा

Piramal Pharma Share: गेल्या 6 महिन्यांत कंपनीने 35 टक्के परतावा दिला आहे.

राहुल शेळके

Piramal Pharma Share: पिरॅमल फार्माच्या (Piramal Pharma) शेअर्समध्ये नुकतीच सुमारे 8 टक्क्यांनी वाढ झाली. हा शेअर 3.24 टक्क्यांच्या वाढीसह 95.55 रुपयांवर ट्रेड करत आहे. वास्तविक, कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या सप्टेंबर तिमाहीत कंपनीने निव्वळ नफा नोंदवला आहे. कंपनीने कंसोलिडेटेड रेव्हेन्यूमध्ये वार्षिक 11 टक्के वाढ नोंदवली.

महसुलातील वाढ आणि खर्च-ऑप्टिमायझेशनमुळे कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसच्या प्रॉफिटेबिलिटीमध्ये सुधार झाला आहे. पिरामल फार्माने अखेर सप्टेंबर तिमाहीत 5 कोटी प्रॉफिट ऑफ्टर टॅक्ससह नफा कमावला.

कंपनीला वर्षभरापूर्वीच्या कालावधीत 37 कोटीचा आणि मागील तिमाहीत 99 कोटीचा तोटा झाला होता. त्याच्या एबिटदामध्येही वर्षभरात 44 टक्क्यांची मजबूत वाढ दिसून आली. पिरामल फार्माने सांगितले की त्यांनी 128 टक्के सबस्क्रिप्शनसह 1,050 कोटी रुपयांचा राइट्स इश्यू पूर्ण केला.

पिरॅमल फार्माचे शेअर्स गेल्या एका महिन्यात सुमारे 6 टक्क्यांनी घसरलेत. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत 35 टक्के परतावा दिला आहे. या वर्षात कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 20 टक्क्यांनी घसरलेत. त्याचवेळी, गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांचे 41 टक्के नुकसान झाले आहे.

या फार्मास्युटिकल कंपनीने आर्थिक वर्ष (FY23) मार्च तिमाहीच्या अखेरीस 4,781 कोटीवरून निव्वळ कर्ज सप्टेंबर तिमाहीच्या अखेरीस 3,823 कोटींपर्यंत कमी करण्यात यश मिळवले.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT