pre analysis of share market sakal
Share Market

Share Market : आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

शिल्पा गुजर

शुक्रवारी आयटी, कॅपिटल गुड्स आणि पीएसयू बँकांमधील जोरदार खरेदीमुळे भारतीय इक्विटी बेंचमार्क मजबूत वाढीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 463.06 अंकांनी अर्थात 0.76 टक्क्यांनी वाढून 61112.44 वर बंद झाला आणि निफ्टी 150 अंकांनी म्हणजेच 0.84 टक्क्यांनी वाढून 18065 वर बंद झाला (pre analysis of share market update 2 May 2023 )

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

आठवड्याच्या शेवटी बाजाराने जोरदार व्यवहार केला आणि सुमारे एक टक्का वाढ नोंदवल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. मंदीच्या सुरुवातीनंतर, निवडक इंडेक्समध्ये खरेदी झाल्याने बाजार सावरण्यास मदत झाली. मात्र, खरी रॅली शेवटच्या ट्रेडिंग तासात आली. त्यामुळे निफ्टी 18100 च्या जवळ पोहोचला.

शुक्रवारी सर्वच क्षेत्रात तेजी खरेदी दिसून आली. सर्वात जास्त वाढ एनर्जी, आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्पेसमध्येही चांगली वाढ झाली आहे. अमेरिकन बाजारातील नुकत्याच झालेल्या तेजीमुळे भारतीय बाजारांमध्येही उत्साह संचारला.

त्याचबरोबर आतापर्यंत आलेल्या कंपन्यांच्या निकालांवरून संमिश्र संकेत मिळत आहेत. बाजारातील तेजीचा मूड यापुढेही कायम राहण्याची आशा आहे. यादरम्यान काही घसरण झाली तर दर्जेदार शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
नेसले इंडिया (NESTLEIND)
विप्रो (WIPRO)
ब्रिटानिया (BRITANNIA)
लॉरस लॅब (LAURUSLABS)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)
पीएनबी (PNB)
ऍस्ट्रल (ASTRAL)
पर्सिस्टंट (PERSISTENT)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Crime News : लोणी काळभोर येथील पाच अट्टल गुन्हेगार दोन वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार

SCROLL FOR NEXT