Rashi Peripherals IPO opens today. GMP, review, other details  Sakal
Share Market

Rashi Peripherals IPO: राशी पेरिफेरल्सचा आयपीओ आजपासून खुला, पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या तपशील

Rashi Peripherals IPO Open From Today, Know Details Before Investing Money: राशी पेरिफेरल्सचा आयपीओ आजपासून खुला झाला आहे. या इश्यूद्वारे 600 कोटी उभारण्याची कंपनीची योजना आहे. 9 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी असणार आहे.

राहुल शेळके

Rashi Peripherals IPO: राशी पेरिफेरल्सचा आयपीओ आजपासून खुला झाला आहे. या इश्यूद्वारे 600 कोटी उभारण्याची कंपनीची योजना आहे. 9 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी असणार आहे.

राशी पेरिफेरल्सच्या आयपीओअंतर्गत 600 कोटीचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. त्याच वेळी, ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत कोणतीही विक्री होणार नाही. आधी आयपीओची साईज 750 कोटी होती, जी प्री-आयपीओ प्लेसमेंटमध्ये निधी उभारल्यानंतर आता कमी होऊन 600 कोटी झाली आहे.

व्होल्राडो व्हेंचर पार्टनर्स फंड-III-बीटा आणि माधुरी मधुसूदन केला यांनी 17 जानेवारी 2024 रोजी प्री प्रायव्हेट प्लेसमेंटद्वारे कंपनीमध्ये अनुक्रमे 100 कोटी आणि 50 कोटीची गुंतवणूक केली. व्होल्राडो आणि केला हे कंपनीचे 10.35 टक्के शेअर्स असलेले एकमेव सार्वजनिक भागधारक आहेत, तर बाकी 89.65 टक्के शेअर्स प्रमोटर्सकडे आहेत.

या आयपीओमधून मिळणारे 326 कोटी कर्जाची परतफेड करण्यासाठी तर खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी 220 कोटी खर्च केले जाणार आहेत. नोव्हेंबर 2023 पर्यंत कंपनीचे एकूण थकित कर्ज रुपये 1,569.4 कोटी आहे. जेएम फायनान्शिअल आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज या इश्यूसाठी बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत.

कृष्णकुमार चौधरी आणि सुरेशकुमार पानसारी यांनी 1989 मध्ये कंपनीची स्थापना केली होती. राशी पेरिफेरल्स सप्टेंबर 2022 पर्यंत भारतातील 730 ठिकाणी 50 शाखा आणि 62 गोदामांद्वारे दोन वर्टिकल चालवते.

कंपनी पर्सनल कॉम्प्युटिंग, पर्सनल कंप्यूटिंग डिवाइस, एंटरप्राइझ सोल्यूशन्स, एम्बेडेड डिझाइन आणि उत्पादने आणि क्लाउड कंप्यूटिंग डिस्ट्रिब्यूट करते.

दुसरे वर्टिकल लाइफस्टाइल आणि आयटी एसेंशियल आहे, ज्या अंतर्गत ते ग्राफिक कार्ड्स, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट्स आणि मदरबोर्ड, स्टोरेज आणि मेमरी डिव्हाइसेस, लाइफस्टाइल पेरिफेरल्स आणि ॲक्सेसरीज, पॉवर इक्विपमेंट आणि नेटवर्किंग आणि मोबिलिटी डिव्हाइसेस डिस्ट्रिब्यूट करते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT