Mukesh Ambani  Sakal
Share Market

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांनी घेतले कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज, काय आहे कारण

मुकेश अंबानी ही रक्कम भांडवली खर्चासाठी वापरणार आहे.

राहुल शेळके

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि त्यांचे दूरसंचार युनिट जिओ इन्फोकॉम यांनी सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज उभारले आहे. हे कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज म्हटले जात आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने परकीय चलन कर्जाच्या रूपात विविध बँकांच्या संघाकडून दोन टप्प्यांत 5 अब्ज डॉलर जमा केले आहेत. जे कर्ज बँक/वित्तीय संस्थांच्या समूहाकडून घेतले जाते त्याला सिंडिकेट कर्ज असे म्हणतात.

55 बँकांकडून 3 अब्ज डॉलर घेतले कर्ज

गेल्या आठवड्यात रिलायन्सने 55 बँकांकडून 3 अब्ज डॉलर्स कर्ज घेतले होते. रिलायन्स जिओ इन्फोकॉमने 18 बँकांकडून दोन अब्ज डॉलर्सचे अतिरिक्त कर्ज घेतले आहे. 31 मार्चपर्यंत 3 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते, तर या आठवड्यात मंगळवारी 2 अब्ज डॉलर कर्ज घेतले आहे.

5G नेटवर्क सुरू करण्यासाठी पैसे खर्च केले जातील

रिलायन्स जिओ ही रक्कम भांडवली खर्चासाठी वापरणार आहे. हा पैसा जिओ देशभरात 5G नेटवर्क सुरू करण्यासाठी खर्च करेल. तैवानमधील सुमारे दोन डझन बँकांसह, तसेच बँक ऑफ अमेरिका, HSBC, MUFG, Citi, SMBC, Mizuho आणि Credit Agricole या जागतिक बँकांसह 55 बँकाकडून प्रारंभिक 3 अब्ज डॉलर कर्ज उभारले गेले

प्राथमिक कर्जाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर दोन अब्ज डॉलर्सचे अतिरिक्त कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर 55 बँकांकडून दोन अब्ज डॉलर्सचे नवीन कर्जही याच अटींवर घेण्यात आले.

मुकेश अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत ठरले

दरम्यान, मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या 2023 च्या अब्जाधीशांच्या यादीत, अंबानी 83.4 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील 9 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

याआधी, 2022 मध्ये RIL, 100 बिलियन डॉलर पेक्षा जास्त महसूल मिळवणारी पहिली भारतीय कंपनी बनली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे दुःखद निधन

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT