Adani-Hindenburg Case Sakal
Share Market

Adani-Hindenburg Case: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत

Adani-Hindenburg Case: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अखेर आला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज 3 जानेवारी रोजी निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अदानी समूहाला या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.

राहुल शेळके

Adani-Hindenburg Case: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अखेर आला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज 3 जानेवारी रोजी निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अदानी समूहाला या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात अदानी समुहाला दिलासा दिला असून हे प्रकरण एसआयटीकडे पाठवण्यास नकार दिला आहे. आपल्या निर्णयात, न्यायालयाने उर्वरित दोन तपासांसाठी सेबी म्हणजेच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाला तीन आठवड्यांच्या सूचना दिल्या आहेत. या अगोदर सेबीने 22 तपास पूर्ण केले आहेत.

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अदानी समूहाच्या शेअर बाजारात लिस्ट असलेल्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. शेअर बाजारात अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स 14.29 % वाढून 1214 रुपयांवर पोहोचले.

अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्येही 10 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर एनडीटीव्हीचा शेअर 9.15 टक्क्यांनी वाढला आहे. अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 8 टक्के, तर अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसमध्ये 7 टक्क्यांनी वाढले.

अदानी विल्मरचे शेअर्स 7.49 टक्क्यांनी वाढले, तर अदानी पोर्ट्सचे शेअर्स 5 टक्क्यांहून अधिक वाढले. गौतम अदानी यांच्या सिमेंट कंपन्यांचे शेअर्सही तेजीसह व्यवहार करत होते. अंबुजा सिमेंटचा शेअर 2.48 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. याशिवाय, इतर शेअर्सप्रमाणे, एसीसी सिमेंटच्या शेअरमध्येही 2.32 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT