SEBI  Sakal
Share Market

SEBI IPO Rules: IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना SEBI चा मोठा दिलासा, IPO बंद होण्याच्या...

SEBI IPO Rules: IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

राहुल शेळके

SEBI IPO Rules: कंपन्यांच्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता IPO बंद झाल्याच्या तीन दिवसांनंतरच स्टॉक एक्स्चेंजवर IPO सूचिबद्ध होईल.

शेअर बाजार नियामक SEBI ने IPO ला सूचीबद्ध करण्याची वेळ T+6 दिवसांवरून T+3 पर्यंत कमी केली आहे. नवीन नियमांनुसार, डिसेंबर 2023 पासून स्टॉक मार्केटमध्ये येणार्‍या सर्व IPO ला शेवटच्या तारखेच्या 3 दिवसांनंतर कंपनी सूचीबद्ध करावी लागेल.

सेबीने सांगितले की सल्लागार पेपर जारी केल्यानंतर, बाजारातील सहभागींशी चर्चा केल्यानंतर आणि लोकांकडून मिळालेल्या सुचनेमुळे आयपीओचा सूचीबद्ध कालावधी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता, IPO बंद होण्याच्या तारखेनंतर 6 दिवसांऐवजी, IPO बंद होण्याच्या तीन दिवसांनंतरच्या दिवशीच IPO स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध होईल. कंपन्यांना त्यांच्या ऑफर दस्ताऐवजात सूचीबद्ध करण्याची टाइमलाइन तीन दिवसांच्या आत जाहीर करावी लागेल.

SEBI ने सांगितले की 1 सप्टेंबर 2023 पासून हा नियम ऐच्छिक आधारावर IPO आणणाऱ्या कंपन्यांना लागू होईल. तर 1 डिसेंबर 2023 पासून तो अनिवार्य असेल.

सेबीने म्हटले आहे की, आयपीओच्या लिस्टिंग टाइमलाइनमध्ये कपात केल्यास गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल. त्यांना त्यांचे पैसे लवकरच परत मिळतील, त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप केले जाईल.

यासोबतच ज्या गुंतवणूकदारांचे शेअर्सचे वाटप झाले नाही त्यांना त्यांचे पैसेही लवकरच परत मिळतील. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांना लवकरच वाटप प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

28 जून 2023 रोजी सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी बोर्डाच्या बैठकीनंतर सांगितले की, शेअर बाजार नियामक सेबीने IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांना आता इश्यू बंद झाल्यानंतर केवळ तीन दिवसांनी स्टॉक एक्स्चेंजमध्ये आयपीओ सूचीबद्ध करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT