Share Market Closing Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान, सेन्सेक्स 73,400 वर बंद

Share Market Today: सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्री दिसून आली. आज म्हणजेच 15 एप्रिल रोजी कमकुवत जागतिक संकेतांचा बाजारावर परिणाम झाला. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजार सावध झाले आहेत

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 15 April 2024: सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्री दिसून आली. आज म्हणजेच 15 एप्रिल रोजी कमकुवत जागतिक संकेतांचा बाजारावर परिणाम झाला. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजार सावध झाले आहेत, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारांवरही दिसून आला. सेन्सेक्स 845 अंकांनी घसरून 73,399 वर बंद झाला. निफ्टीही 22,272 पर्यंत घसरला. बाजारातील चौफेर विक्रीत बँकिंग, आयटी आणि मीडिया क्षेत्र आघाडीवर होते.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती 

तेल आणि गॅस क्षेत्राव्यतिरिक्त, भारतीय शेअर बाजारातील सर्व क्षेत्रात घसरण झाली आहे. बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली आहे. याशिवाय आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. केवळ तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले.

Sensex Today

कोणते शेअर्स तेजीत?

आजच्या व्यवहारात मारुती सुझुकी 1.24 टक्के, नेस्ले 1.22 टक्के, भारती एअरटेल 0.16 टक्के, सन फार्मा 0.10 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. विप्रो 2.47 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला, तर टायटन कंपनी 0.50 टक्क्यांनी, एशियन पेंट्स 0.42 टक्क्यांनी, पॉवर ग्रिड 0.16 टक्क्यांनी, बजाज फिनसर्व्ह 2.15 टक्क्यांनी घसरले.

Nifty Today

कोणते शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर?

शेअर बाजारातील कामगिरीतील प्रचंड घसरणीदरम्यान, एस्टर डीएम हेल्थ, आनंद राठी वेल्थ, थरमॅक्स, एक्साइड इंडस्ट्रीज, हिंदाल्को आणि इंडस टॉवर्सचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. शेअर बाजारातील घसरणीमुळे हिंदुस्थान युनिलिव्हर, वेदांत फॅशन आणि डाबर इंडियाचे शेअर्स 52 आठवड्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत.

S&P BSE SENSEX

गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान

शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे कंपन्यांचे मार्केट कॅप 5 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, मार्केट कॅप 394.72 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे जे गेल्या सत्रात 399.76 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात मार्केट कॅप 5.04 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT