Share Market
Share Market Sakal
Share Market

Share Market : मिडकॅप कंपनीच्या 'या' शेअरमध्ये 9 वर्षात मोठी वाढ, आणखीन वाढीचा तज्ज्ञांना विश्वास

सकाळ डिजिटल टीम

Share Market Investment Tips : वोल्टॅम्प ट्रांसफॉर्मर्स (Voltamp Transformers) ही एक मिडकॅप कंपनी असून तिचे मार्केट कॅप 2,780 कोटी आहे. कंपनीचे शेअर्स सध्या 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा जवळपास 26 टक्क्यांनी खाली व्यवहार करत आहे.

असे असले तरी ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने या शेअर्समध्ये 35 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्सचा रेव्हेन्यू डायव्हर्सिफाइड आहे आणि त्याचा सुमारे 85 टक्के रेव्हेन्यू प्रायव्हेट सेक्टरमधून येतो.

गेल्या काही वर्षांत, त्याने आपल्या क्लायंटशी मजबूत संबंध निर्माण केले आहेत, ज्यामुळे त्याला देशभरात आणि परदेशात 60,000 ट्रान्सफॉर्मर लावण्यात मदत झाली आहे. (Share Market Buy Voltamp Transformers shares, target price Rs 3610 ICICI Securities)

व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्सने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 36.34 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 5 वर्षांत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 148.14% इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 9 वर्षांत त्याचे शेअर्स 600% पेक्षा जास्त वाढले आहेत.

कंपनीचे सध्याचे ऑर्डर बुक 9 अब्ज रुपये आहे. त्यांची बॅलेन्सशीटही मजबूत आहे. कंपनीटा आउटलूक चांगला आहे आणि ही वाढ पुढील 3 वर्षे मजबूत राहण्याची शक्यता आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्सवर 'बाय' रेटिंग 3,610 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. सध्या व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्सचे शेअर्स एनएसईवर 2,755 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT