Share Market Closing Bell eSakal
Share Market

Closing Bell : शेअर बाजाराची सपाट क्लोजिंग; मेटल सेक्टरमध्ये तेजी, बँकनिफ्टीमध्ये पडझड

Share Market Today : संध्याकाळी मार्केट क्लोज होताना सेन्सेक्स 33.40 अंकांनी वधारून 74,119 अंकांवर पोहोचलं होतं. तर निफ्टीमध्ये 19.50 अंकांची वाढ होऊन ते 22,493 अंकांवर पोहोचलं होतं.

Sudesh

Share Market Closing Bell Today : गुरुवारी सकाळी विक्रमी तेजीत सुरू झालेला शेअर बाजार बंद होताना मात्र सपाट राहिला. सेन्सेक्स अन् निफ्टी दोन्हीमध्ये प्रचंड व्होलेटॅलिटी पहायला मिळाली. आजच्या व्यवहारांमध्ये मेटल आणि FMGC सेक्टरमध्ये तेजी पहायला मिळाली. तर ऑईल-गॅस, ऑटो आणि बँकनिफ्टीमध्ये पडझड पहायला मिळाली.

संध्याकाळी मार्केट क्लोज होताना सेन्सेक्स 33.40 अंकांनी वधारून 74,119 अंकांवर पोहोचलं होतं. तर निफ्टीमध्ये 19.50 अंकांची वाढ होऊन ते 22,493 अंकांवर पोहोचलं होतं. बँकनिफ्टीमध्ये 129.60 अंकांची घट होऊन ते 47,835 अंकांवर पोहोचलं होतं.

आज मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी पहायला मिळाली. सेन्सेक्सच्या 30 पैकी 20 शेअर्स तेजीत होते, तर 10 शेअर्स रेड मार्कवर बंद झाले. निफ्टीच्या 50 पैकी 30 शेअर्स तेजीत होते, तर 20 शेअर्स रेड मार्कवर बंद झाले.

टॉप गेनर्स अन् लूजर्स

आजच्या व्यवहारांमध्ये टाटा स्टील हा शेअर टॉप गेनर राहिला. यामध्ये 3.73 टक्क्यांची वाढ दिसून आली. M&M हा आजचा टॉप लूजर राहिला. यामध्ये 3.71 टक्क्यांची घट दिसून आली. आजचं बेस्ट सेक्टर हे निफ्टी मेटल राहिलं, ज्यात 1.38 टक्के वाढ दिसून आली. आजचं वर्स्ट सेक्टर हे निफ्टी एनर्जी राहिलं, ज्यामध्ये 0.37 टक्के घट दिसून आली.

सेक्टोरल इंडेक्स

आज FMGC, आयटी, पीएलयू बँक, फार्मा, मेटल, मीडिया, कमोडिटी, कंझ्यूमर ड्यूरेबल्स आणि हेल्थकेअर सेक्टर तेजीत राहिले. तर बँकिंग, ऑईल अँड गॅस, एनर्जी, रिअल इस्टेट आणि इन्फ्रा स्टॉक्स रेड मार्कवर क्लोज झाले.

मार्केट व्हॅल्यू वाढली

शेअर बाजारात हलकी तेजी दिसून आल्यामुळे बीएसईचं मार्केट कॅप वाढलं आहे. मागच्या सत्रामध्ये ही संख्या 391.37 लाख कोटी रुपये होती. तर आता हा आकडा 392.75 लाख कोटींवर पोहोचला आहे. आजच्या एका दिवसात बाजाराच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये 1.38 लाख कोटी रुपयांची वाढ झालेली पहायला मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT