Share Market Latest Update  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; निफ्टी 25,000 च्या वर, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Closing Today: आज गुरुवारी (10 ऑक्टोबर) देशांतर्गत शेअर बाजारात तेजी कायम राहिली, मात्र दुसऱ्या सहामाहीत निर्देशांक वरच्या पातळीवरून घसरताना दिसले. सेन्सेक्स 144 अंकांनी वाढून 81,611 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 10 October 2024: आज गुरुवारी (10 ऑक्टोबर) देशांतर्गत शेअर बाजारात तेजी कायम राहिली, मात्र दुसऱ्या सहामाहीत निर्देशांक वरच्या पातळीवरून घसरताना दिसले. सेन्सेक्स 144 अंकांनी वाढून 81,611 वर बंद झाला. निफ्टी 16 अंकांनी वाढून बंद झाला. निफ्टी बँक 500 हून अधिक अंकांच्या वाढीसह बंद झाला. बँकिंग शेअर्समध्ये वाढ झाल्याने बँक निफ्टी आज तेजीत होता.

गुरुवारी सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 16 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात आणि 14 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात बंद झाले. त्याचप्रमाणे निफ्टी 50 मध्ये 50 शेअर्सपैकी 23 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात आणि 27 कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात बंद झाले.

Share Market Closing
कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये वाढ

आज कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 4.16 टक्के वाढीसह बंद झाले. याशिवाय जेएसडब्ल्यू स्टील 1.82 टक्के, एचडीएफसी बँक 1.72 टक्के, इंडसइंड बँक 1.43 टक्के, पॉवर ग्रिड 1.39 टक्के, मारुती सुझुकी 1.34 टक्के, ॲक्सिस बँक 1.20 टक्के, एनटीपीसी 1.09 टक्के वाढीसह बंद झाले.

अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, बजाज फायनान्स, आयटीसी आणि एचसीएल टेक यांचे शेअर्सही हिरव्या रंगात बंद झाले.

Share Market Closing
टेक महिंद्राचे मोठे नुकसान

टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये आज सर्वात मोठी 2.82 टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय सन फार्माचे शेअर्स 1.90 टक्के, इन्फोसिस 1.78 टक्के, टाटा मोटर्स 1.10 टक्के, टायटन 1.00 टक्के, लार्सन अँड टुब्रो 0.74 टक्के, टीसीएस 0.56 टक्के घसरून बंद झाले.

हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल आणि स्टेट बँक यांचे शेअर्सही लाल रंगात होते.

BSE SENSEX
क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, मेटल, ऊर्जा, इन्फ्रा शेअर्स वाढीसह बंद झाले. तर आयटी, फार्मा, एफएमसीजी, रिअल इस्टेट, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस शेअर्स घसरले. मिडकॅप शेअर्सच्या घसरणीमुळे निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 166 अंकांच्या घसरणीसह बंद झाला, तर निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाला. आजच्या व्यवहारात मार्केट कॅप 462.22 लाख कोटी रुपयांवर बंद झाले.

टाटा समूहाच्या शेअर्समध्ये संमिश्र व्यवहार

रतन टाटा यांच्या निधनानंतर शेअर बाजारात आज टाटा समूहाचे शेअर्स संमिश्र व्यवहार करत होते. 24 लिस्टेड कंपन्यांपैकी 16 कंपन्यांचे शेअर्स वधारले तर 8 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. टाटा इन्व्हेस्टमेंट, टाटा केमिकल्स, टाटा कॉफी, टाटा मेटॅलिक्स, टाटा टेलिसर्व्हिसेसचे शेअर्स वाढीसह बंद झाले आहेत. तर व्होल्टास, ट्रेंट, टायटन या शेअर्समध्ये घसरण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: अ‍ॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यास ‘बीसीआय’ची स्थगिती; आदेशात नेमकं काय म्हटलं?

Mangalwedha News : नगराध्यक्षपदाच्या तीन अर्जासह नगरसेवकाच्या दोन अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना प्रतीक्षा

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT