Share Market Sakal
Share Market

Share Market Closing: बाजार ऐतिहासिक पातळीवर बंद; निफ्टीने प्रथमच 20,160 चा टप्पा केला पार, सेन्सेक्सने...

Share Market Closing: शेअर बाजारात गुरुवारी नवे विक्रमी उच्चांक नोंदवले गेले.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 14 September 2023:

शेअर बाजारात गुरुवारी नवे विक्रमी उच्चांक नोंदवले गेले. प्रमुख बाजार निर्देशांक नवीन शिखरांवर बंद झाले. BSE सेन्सेक्स 52 अंकांनी वाढून 67,519 वर बंद झाला.

इंट्राडेमध्ये निर्देशांकाने 67,771 चा उच्चांक गाठला. त्याचप्रमाणे निफ्टी देखील 33 अंकांनी वाढून 20,103 वर बंद झाला, ज्याने व्यवहारादरम्यान 20,167 चा सर्वकालीन उच्चांक गाठला.

शेअर बाजारातील विक्रमी रॅलीत ऑटो, मेटल आणि रियल्टी शेअर्स चमकले. NSE वर निफ्टी रियल्टी, मेटल, PSU बँकिंग निर्देशांक 1-1 टक्क्यांच्या वर बंद झाले. UPL, Hindalco आणि M&M हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले, तर एशियन पेंट्सचे शेअर्स सर्वाधिक घसरले.

Share Market Closing 14 September 2023 (S&P BSE SENSEX)

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

आजच्या व्यवहारात मिड कॅप निर्देशांक 471 अंकांच्या तेजीसह 40,716 अंकांवर तर स्मॉल कॅप निर्देशांक 165 अंकांच्या तेजीसह 12,741 अंकांवर बंद झाला. याशिवाय बँकिंग, आयटी, ऑटो, मेटल्स, एनर्जी, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले.

तर एफएमसीजी आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्स घसरले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 15 शेअर्स वाढीसह आणि 15 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 31 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 19 शेअर्स घसरले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स बीएसई सेन्सेक्सवर 2.50 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. याशिवाय टाटा स्टील, टेक महिंद्रा आणि नेस्ले इंडियाचे शेअर्स प्रत्येकी एक टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले.

याशिवाय पॉवरग्रीड, इन्फोसिस, एचसीएल टेक, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, लार्सन अँड टुब्रो, एनटीपीसी आणि विप्रो यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

सेन्सेक्सवर एशियन पेंट्सचे शेअर्स 1.04 टक्क्यांच्या सर्वात मोठ्या घसरणीसह बंद झाले. त्याच वेळी, आयटीसी, सन फार्मा, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, एचयूएल, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण

गुरुवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया थोड्या घसरणीसह 83.03 वर बंद झाला. मागील सत्रात तो 82.99 च्या पातळीवर बंद झाला होता.

गुंतवणूकदारांना 1.94 लाख कोटी रुपयांचा नफा

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 322.19 लाख कोटी रुपये झाले आहे तर गेल्या सत्रात मार्केट कॅप 320.25 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.94 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT