Share Market Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात 3 दिवसांच्या तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 250 अंकांनी घसरला, अदानी शेअर्सची काय स्थिती?

Share Market Closing: निफ्टी 93 अंकांनी घसरून 19,253 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 31 August 2023: आज शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. बाजाराचे प्रमुख निर्देशांक सकाळी तेजीसह उघडले, परंतु शेवटी घसरणासह बंद झाले. BSE सेन्सेक्स 255 अंकांनी घसरून 64,831 वर आला. निफ्टीही 93 अंकांनी घसरून 19,253 वर बंद झाला.

अदानी समूहाचे शेअर्स घसरले

अदानी समूहाच्या शेअर्सने बाजाराचा मूड खराब केला. निफ्टीमध्ये, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 3.5% घसरून बंद झाले, तर जिओ फायनान्शियल आणि मारुती सुझुकी 2 ते 3% ने घसरून बंद झाले.

Share Market Closing Latest Update 31 August 2023 (S&P BSE SENSEX)

आज सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 9 शेअर्स तेजीसह बंद झाले आणि उर्वरित 21 शेअर्स घसरणीसह बंद झाले. मारुतीचा शेअर आजचा टॉप गेनर होता आणि तो 2.22 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

टायटन 1.09 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 1.02 टक्के आणि टाटा स्टील 0.78 टक्क्यांनी वधारले. आयसीआयसीआय बँक 0.42 टक्के, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस 0.41 टक्के, एचसीएल टेक 0.41 टक्क्यांनी वाढीसह बंद झाले. विप्रोचा शेअर 0.29 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

बीएसई सेन्सेक्सवर एशियन पेंट्सचे शेअर्स 1.33 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. याशिवाय अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, एसबीआय, बजाज फायनान्स आणि नेस्ले इंडियाचे शेअर्स एक टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाले.

याशिवाय बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, जेएसडब्ल्यू स्टील, पॉवरग्रिड, आयटीसी, एनटीपीसी, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक आणि सन फार्मा यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्समध्ये मारुतीचा शेअर सर्वाधिक 2.22 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आणि जिओ फायनान्शियलचे शेअर्स तेजीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 43,000 हजार कोटी रुपयांची घट झाली

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट झाली आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 309.87 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे, जे मागील ट्रेडिंग सत्रात 310.30 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे  43,000 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT