Share Market Sakal
Share Market

Share Market Closing: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 286 अंकांच्या खाली, बँकिंग शेअर्सचे काय झाले?

Share Market Closing: शेअर बाजारात आज चौफेर विक्रीची नोंद झाली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 4 October 2023:

बुधवारी (4 ऑक्टोबर) सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 286 अंकांनी घसरून 65,226 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही 79 अंकांच्या घसरणीसह 19,450 च्या खाली बंद झाला.

शेअर बाजारात आज चौफेर विक्रीची नोंद झाली. यामध्ये सरकारी बँकिंग शेअर्स, ऑटो, मेटल मीडिया क्षेत्र आघाडीवर राहिले. निफ्टीमध्ये अॅक्सिस बँक आणि एसबीआयचे शेअर्स सर्वाधिक घसरले.

एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला खालच्या पातळीवरून पाठिंबा मिळाला. निफ्टीमध्ये, अदानी एंटरप्रायझेस आणि नेस्लेच्या शेअर्समध्ये प्रत्येकी 3 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्सच्या घसरणीमुळे बँक निफ्टी 435 अंकांनी घसरून 43,964 अंकांवर बंद झाला. याशिवाय ऑटो, फार्मा, मेटल, एनर्जी, इन्फ्रा, हेल्थकेअर आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्सही घसरणीसह बंद झाले.

केवळ आयटी आणि एफएमसीजी शेअर्स वाढीसह बंद झाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही नफा बुकिंग दिसून आले. मिड कॅप निर्देशांक 1.38 टक्क्यांनी घसरून 40047 वर बंद झाला तर स्मॉल कॅप 160 अंकांनी घसरून 12,656 अंकांवर बंद झाला.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 7 शेअर्स वाढीसह आणि 23 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 11 शेअर्स वाढीसह आणि 39 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्समध्ये अॅक्सिस बँक, एनटीपीसी, इंडसइंड बँक, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील आणि बजाज फिनसर्व्ह यांचे शेअर्स घसरले. इंडियाबुल्स हाऊसिंग 7.15% घसरून सर्वाधिक घसरले होते. त्याचप्रमाणे मेट्रो ब्रँड 5.76% आणि JSW एनर्जी 5.35%, मणप्पुरम फायनान्स 5.10%, शोभा लिमिटेड 4.71% चे शेअर्स घसरले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये वाढ

सेन्सेक्समध्ये नेस्लेचा शेअर 2.79% वाढीसह बंद झाला. हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक आणि एशियन पेंट्स, टीसीएस इन्फोसिसचे शेअर्स वाढले. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे शेअर्स 6.30% च्या वाढीसह व्यवहार करत होते. तर Aki India Ltd 4.95% चे शेअर्स वाढले. त्याचप्रमाणे, एडलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस 4.68%, CE इन्फो सिस्टीम 4.33%, एव्हेन्यू सुपरमार्ट 3.95% चे शेअर्स वाढले.

गुंतवणूकदारांचे 2.5 लाख कोटी रुपये बुडाले

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 4 ऑक्टोबर रोजी 316.72 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे मंगळवार 3 ऑक्टोबर रोजी 319.21 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.49 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.49 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT