Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today sbi lt bharti airtel tata consumer lupin share price 1 November 2023  Sakal
Share Market

Share Market Closing: सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद; सलग दुसऱ्या दिवशी बाजारात विक्री

Share Market Closing: निफ्टी 90 अंकांनी घसरून 18,989 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 1 November 2023:

बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. BSE सेन्सेक्स 283 अंकांनी घसरून 63,591 वर आला. त्याचप्रमाणे निफ्टीही 90 अंकांनी घसरून 18,989 वर बंद झाला. आयटी, धातू, वाहन आणि बँकिंग क्षेत्रातून बाजारात दबाव आला. तर मीडिया, फार्मा, सरकारी बँकिंग आणि रियल्टी क्षेत्रात खरेदी झाली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, कमोडिटी, कंझ्युमर ड्युरेबल्स यांसारख्या क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर तेल आणि गॅस, हेल्थकेअर, मीडिया, रिअल इस्टेट, फार्मा, पीएसयू बँक संबंधित निर्देशांक वाढीसह बंद झाले.

आजच्या व्यवहारात मिड कॅप निर्देशांक घसरणीसह बंद झाला तर स्मॉल कॅप निर्देशांक सपाट बंद झाला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 7 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 23 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीचे 11 शेअर्स वाढीसह बंद झाले, तर 39 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing 1 November 2023 (S&P BSE SENSEX)

गुंतवणूकदारांचे 1.24 लाख कोटी रुपयांचे नुकसान

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 1 नोव्हेंबर रोजी वाढून 310.21 लाख कोटी रुपये झाले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे मंगळवारी, 31 ऑक्टोबर रोजी 311.45 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.24 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.24 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 7 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. त्यातही सन फार्माच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.67 टक्के वाढ झाली. तर ITC, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

सेन्सेक्सचे उर्वरित 23 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यापैकी टाटा स्टीलचे शेअर्स 2.11 टक्क्यांनी घसरले. याशिवाय एशियन पेंट्स, मारुती सुझुकी, एचसीएल टेक आणि नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Rain-Maharashtra Latest live news update: मालेवाडी परिसरात पूरस्थिती, सोळा गावांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT