Share Market Closing latest updates in marathi Sensex, Nifty today state bank of india hero motocorp indigo share price 2 November 2023  Esakal
Share Market

Share Market Closing: फेड रिझर्व्हच्या निर्णयाने शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्समध्ये 500 अंकांची वाढ; कोणते शेअर्स चमकले?

Share Market Closing: शेअर बाजारात सलग दोन दिवस विक्री झाल्यानंतर गुरुवारी खरेदीची नोंद झाली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 2 November 2023:

शेअर बाजारात सलग दोन दिवस विक्री झाल्यानंतर गुरुवारी खरेदीची नोंद झाली. प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स 500 अंकांच्या वाढीसह 64,080 वर बंद झाला. निफ्टीही 156 अंकांनी वाढून 19,145 वर पोहोचला.

खरेदीचा गुंतवणूकदारांना फायदा

शेअर बाजारातील खरेदीमुळे शेअर बाजाराच्या तेजीला आधार मिळाला. बाजारातील तेजीत गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला आहे.

आजच्या खरेदीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 3.22 लाख कोटी रुपयांनी वाढून 313.44 लाख कोटी रुपये झाले, जे काल 310.22 लाख कोटी रुपये होते.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. बँकिंग शेअर्स व्यतिरिक्त ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, मीडिया, रिअल इस्टेट, हेल्थकेअर, फार्मा, इन्फ्रा या क्षेत्रांतील शेअर्स तेजीत होते.

निफ्टीच्या मिड कॅप निर्देशांकात 500 हून अधिक अंकांची वाढ दिसून आली आहे. स्मॉल कॅप निर्देशांक 170 अंकांच्या तेजीसह बंद झाला आहे.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 28 शेअर्स वधारले आणि केवळ 2 शेअर्स घसरले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 41 शेअर्स वाढीसह आणि 9 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 28 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. त्यातही इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2 टक्क्यांनी वाढ झाली. तर टाटा स्टील, टाटा मोटर्स, सन फार्मा आणि इन्फोसिसचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

आज सेन्सेक्सचे फक्त 2 शेअर्स घसरणीसह बंद झाले. यामध्येही टेक महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक 0.59 टक्क्यांनी घसरले. तर बजाज फायनान्सचे शेअर्स 0.10 टक्क्यांनी घसरून बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT