Share Market Sakal
Share Market

Share Market Closing: आरबीआयच्या निर्णयामुळे शेअर बाजार हादरला, सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला; बँकिंग शेअर्सचे काय झाले?

Share Market Closing: बाजारात आज चौफेर विक्री झाली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 10 August 2023: आरबीआय एमपीसीच्या बैठकीत व्याजदर स्थिर ठेवल्याने बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रावर दबाव होता. BSE सेन्सेक्स 307 अंकांनी घसरून 65,688 वर बंद झाला. तसेच निफ्टी 89 अंकांनी घसरून 19,543 वर बंद झाला.

एशियन पेंट्सचे शेअर्स निफ्टीमध्ये 3% घसरून बंद झाले. तर अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्टचे शेअर्स 1.5 टक्क्यांच्या पुढे बंद झाले आहेत. बाजारात आज चौफेर विक्री झाली.

Share Market Closing Latest Update 10 August 2023

बाजारातील घसरणीची कारणे

  • जागतिक बाजारातून संमिश्र संकेत

  • यूएस किरकोळ महागाईच्या आकडेवारीपूर्वी गुंतवणूकदार सावध

  • अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण

  • एमपीसीच्या बैठकीत आरबीआयने व्याजदर स्थिर ठेवले

  • बँकिंग, वित्तीय, एफएमसीजी शेअर्स घसरले

शेअर बाजाराची क्षेत्रीय स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. RBI ने बँकांसाठी अतिरिक्त रोख राखीव प्रमाण ठेवण्याची तरतूद केली आहे, ज्यामुळे बँक निफ्टी 339 अंकांच्या घसरणीसह 44,541 अंकांवर बंद झाला.

याशिवाय ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, इन्फ्रा, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स या क्षेत्रांचे शेअर्सही घसरले. तर केवळ मीडिया, ऊर्जा, धातू आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले.

आजच्या व्यवहारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सही घसरले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 10 शेअर्स वाढीसह आणि 20 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 19 शेअर्स वाढले तर 31 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

सेन्सेक्समधील 30 पैकी 10 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.59% वाढ झाली. याशिवाय जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, बजाज फायनान्स आणि पॉवर ग्रिडच्या शेअर्सनी आज वेग पकडला आणि वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

दुसरीकडे, सेन्सेक्समधील उर्वरित 20 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. त्यातही एशियन पेंट्सचे शेअर्स सर्वाधिक 2.89% नी घसरले. यानंतर कोटक महिंद्रा बँक, आयटीसी, भारती एअरटेल आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स सर्वाधिक घसरले.

गुंतवणूकदारांचे 72 हजार कोटी रुपये बुडाले

BSE वर सूचीबद्ध केलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज, 10 ऑगस्ट रोजी 305.57 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे, जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजेच बुधवार, 9 ऑगस्ट रोजी 306.29 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 72 हजार कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 72 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT