Share Market sakal
Share Market

Share Market Closing : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी IT FMCG स्टॉकमध्ये प्रॉफीट बुकींग गोंधळ, रिलायंस स्टॉक तेजीत

Share Market News : बीएसईवर लिस्टेड कंपनींचे मार्केट कॅपिटल २९९.६० कोटी रुपयांवर बंद झाले.

धनश्री भावसार-बगाडे

Share Market Update : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात उतार चढाव दिसले. बँकिंग आयटी एफएमसीजी क्षेत्रात शेअर्समध्ये प्रॉफीट बुकींग दिसून आले. पण रिलायंस इंडस्ट्रीच्या शेअर्सने सांभाळून घेतले. सेंसेक्स एक वेळ ३५५ आणि निफ्टी १०० अंकांच्या तेजीने चालत होता पण बाजार बंद होईपर्यंत बीएसई सेंसेक्स ६४ अंकांच्या तेजीसह ६५,३४४ आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे निफ्टी २४ अंकांच्या बूमसह १९,३५५ अंकांवर बंद झाला.

सेक्टर अपडेट

आजच्या ट्रेडिंग सत्रात मेटल्स, एनर्जी, इंफ्रा, ऑइल अँड गॅस सेक्टरचे स्टॉक तेजीत बंद झाले. तर बँकींग आयटी, एफएमसीजी, रियल इस्टेट, मीडिया, हेल्थकेअर, फार्मा सेक्टरचे स्टॉक्समध्ये घसरण दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरसुद्धा घसरणीत बंद झाले. सेंसेक्सच्या ३० शेअर्समध्ये ९ शेअर तेजीत आणि २१ घसरणीत बंद झाले. तर निफ्टीचे ५० शेअर्सपैकी १६ तेजीत आणि ३४ घसरण होत बंद झाले.

वधारलेले व घसरलेले शेअर्स

आज बाजारात सर्वाधिक तेजी ही देशाची आपली कंपनी रिलायंस इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये होती. रिलायंसचे शेअर्स ३.८५ टक्के बूमसहित २७३५ रुपयांवर बंद झाला. याशिवाय टाटा स्टील ३.३२ टक्के, जेएसडब्ल्यु स्टील २.८२ टक्के, भारती एअरटेल १.७२ टक्क्यांच्या बूमने बंद झाला. सगळ्यात मोठी घसरण टायटनमधल्या जिसका स्टॉक ३.१३ टक्के घसरणीने बंद झाला.

गुंतवणुकदारांचे किरकोळ नुकसान

बाजार तेजीसह बंद होऊनही शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांच्या संपत्ती ट्रेडमध्ये आज घसरण दिसून आली. बीएसईवर लिस्टेड कंपनीजचा मार्केट कॅप २९९.६० लाख कोटी रुपये होता. जो मागच्या ट्रेडिंग सत्रात २९९.६८ लाख कोटी रुपये होता. म्हणजेच आज गुंतवणूकदारांनची संपत्तीत ८,००० कोटी रुपयांनी घसरण दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: अजित पवारांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली... नको ते बोलले... थेट पाकिस्तानशी उल्लेख

Tecno Pova Slim : सेम टू सेम आयफोन! चक्क 20 हजारात iPhone Air? नेमकी काय आहे ऑफर, पाहा एका क्लिकवर

Pune Traffic : सवलतीत दंड भरण्यास नागरिकांची झुंबड, फक्त ४००-५०० जणांनाच टोकन; तासन्‌तास रांगेत थांबलेल्यांची नाराजी

Latest Marathi News Updates: भारत -पाकिस्तान मॅचसाठी दीड लाख कोटींचं गॅम्बलिंग : संजय राऊत

ITI Admissions : ‘आयटीआय’चे ८३ टक्के प्रवेश पूर्ण; उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी येत्या शनिवारपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT