Share Market  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात पुन्हा तेजी; सेन्सेक्समध्ये 150 अंकांची वाढ, कोणत्या शेअर्सनी केले मालामाल?

Share Market Closing: निफ्टी 62 अंकांनी वाढून 19,632 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 9 August 2023:

शेअर बाजारात आज BSE सेन्सेक्स 150 अंकांनी वाढून 65,995 वर बंद झाला. निफ्टीही 62 अंकांनी वाढून 19,632 वर बंद झाला. मेटल आणि ऑटो शेअर्स बाजारातील तेजीमध्ये आघाडीवर होते.

डॉ. रेड्डीज आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स 3-3 टक्क्यांनी वाढून बंद झाले. तर डिव्हिस लॅबचा शेअर 2.5 टक्क्यांनी घसरला.

Share Market Closing Latest Update 9 August 2023

शेअर बाजाराची क्षेत्रीय स्थिती

आजच्या व्यवहारात ऑटो, आयटी, फार्मा, एफएनसीजी मेटल, मीडिया, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर आणि ऑइल आणि गॅस सेक्टर्सचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

बँकिंग, रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्स घसरले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळाली.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 13 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 34 शेअर्स तेजीसह आणि 16 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

सेन्सेक्समधील 30 पैकी 17 शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्येही JSW स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.12% वाढ झाली. याशिवाय टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M), टाटा स्टील आणि टायटन यांच्या शेअर्समध्ये आज तेजी होती.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

दुसरीकडे, सेन्सेक्समधील उर्वरित 13 शेअर्स आज घसरले. यामध्येही बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 0.95% घसरण झाली. यानंतर, मारुती सुझुकी, ICICI बँक, एशियन पेंट्स आणि अॅक्सिस बँक यांचे शेअर्स सर्वात जास्त घसरले आणि ते सुमारे 0.40% वरून 0.87% पर्यंत घसरले.

गुंतवणूकदारांनी 97 हजार कोटींची कमाई केली

आज BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 9 ऑगस्ट रोजी वाढून 306.32 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवसाच्या म्हणजेच मंगळवार, 8 ऑगस्ट रोजी 305.35 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 97 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 97 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT