Share Market  Sakal
Share Market

Share Market Closing : 8 दिवसांनंतर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 400 अंकांवर, 'या' शेअर्समध्ये जबरदस्त वाढ

सलग 8 दिवसांच्या विक्रीनंतर बुधवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Closing : सलग 8 दिवसांच्या विक्रीनंतर बुधवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. बाजाराच्या या तेजीत सेन्सेक्स 59,400 आणि निफ्टी 17,450 च्या जवळ व्यवहार करत आहे.

सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्टॉकमध्ये मेटल स्टॉक्स पुढे आहेत. निफ्टी मेटल इंडेक्समध्ये 3.6% ची तेजी आहे. त्याच वेळी, निफ्टीमध्ये अदानी Ent चा हिस्सा 13% वर आहे. हिंदाल्कोचा शेअर 3% वाढला आहे आणि 412 रुपयांचा आकडा पार केला. तर ब्रिटानियाचा शेअर निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली आहे.

BSE India

8 दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात बाउन्स बॅक दिसून आला. मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. मेटल, बँकिंग, आयटी समभागात खरेदी दिसून आली. रियल्टी, पीएसई, ऑटो शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

एनर्जी, इन्फ्रा, एफएमसीजी निर्देशांक वाढीसह बंद झाले. मिडकॅप निर्देशांक 467 अंकांनी वाढून 30,584 वर बंद झाला.

BSE वर आज एकूण 3,626 कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे 2,453 शेअर्स वाढीसह आणि 1,040 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 133 कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.

तर आज 62 शेअर्स 52 आठवड्यांच्या वरच्या पातळीवर बंद झाले आहेत. याशिवाय 162 शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले.

याशिवाय 211 शेअर्समध्ये अप्पर सर्किट, तर 145 शेअर्समध्ये लोअर सर्किटमध्ये आले आहे. याशिवाय आज संध्याकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 17 पैशांनी मजबूत होऊन 82.50 रुपयांवर बंद झाला.

गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3.21 लाख कोटींची कमाई

आज BSE वर सूचीबद्ध झालेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 1 मार्च रोजी 260.93 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मंगळवार, 28 फेब्रुवारी रोजी ते 257.72 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 3.21 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 3.21 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

Uttarakhand: ट्रिप करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! भीमताल ते नैनीताल प्रवास होणार मिनिटांत? रोपवे प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

SCROLL FOR NEXT