Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात सलग 8 व्या दिवशी तेजी; 'या' शेअर्समध्ये झाली वाढ

सेन्सेक्स 235 अंकांच्या वाढीसह 60,392 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing 12th April 2023: बुधवारी सलग 8 व्या दिवशी शेअर बाजाराने वाढ नोंदवली. सेन्सेक्स 235 अंकांच्या वाढीसह 60,392 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही 90 अंकांच्या वाढीसह 17,812 वर बंद झाला.

बाजारातील तेजीत आयटी आणि फार्मा शेअर्स आघाडीवर होते. डिव्हिस लॅबचे शेअर्स निफ्टीमध्ये 9% वाढून बंद झाले. सेन्सेक्स सकाळी 60,180 वर उघडला. मात्र आयटी शेअर्स विक्रीमुळे दबाव दिसून आला.

BSE India

आजच्या व्यवहारात सर्वात जास्त वाढ फार्मा, आयटी, टेक आणि ऑटो शेअर्समध्ये दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.57 टक्के आणि 0.41 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. या तेजीमुळे आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.18 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

गुंतवणूकदारांना 1.18 लाख कोटी नफा :

BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज, 11 एप्रिल रोजी रु. 265.69 लाख कोटी इतके वाढले आहे, जे त्यांच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे मंगळवार, 11 एप्रिल रोजी रु. 264.51 लाख कोटी होते.

अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.18 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.18 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

आजच्या व्यापार सत्रात बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, धातू, तेल आणि वायू, आरोग्यसेवा, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली तर ऊर्जा, एफएमसीजी शेअर्समध्ये घसरण झाली.

मिडकॅप आणि स्मॉल कॅप क्षेत्रातील शेअर्समध्ये आजही वाढ दिसून आली आहे. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 33 वाढीसह आणि 17 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढीसह आणि 13 शेअर्स घसरणीसह बंद झाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

SCROLL FOR NEXT