Share Market  Sakal
Share Market

Share Market Closing : गुंतवणूकदार चिंतेत, शेअर बाजार घसरणीसह बंद; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

आठवड्याचा शेवटच्या व्यापाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत निराशाजनक होता.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Closing : आठवड्याचा शेवटच्या व्यापाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत निराशाजनक होता. जागतिक संकेतांमुळे सकाळी बाजार घसरणीसह उघडला. दिवसभराच्या व्यवहारात चढ-उतार होते. पण बाजार सावरू शकला नाही.

आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 316 अंकांनी घसरून 61,002 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 91 अंकांनी घसरून 17,944 अंकांवर बंद झाला.

आजच्या ट्रेडिंग सत्रात फक्त ऊर्जा, इन्फ्रा, कमोडिटी क्षेत्रातील समभागांना तेजी आली. त्याचबरोबर बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, मेटल्स, मीडिया, रिअल इस्टेट, एफएमसीजी क्षेत्रातील समभाग घसरले.

BSE India

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागही घसरले. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 14 समभाग वाढीसह तर 36 समभाग तोट्यासह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 7 समभाग वाढीसह बंद झाले तर 23 तोट्यासह बंद झाले.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

'या' शेअर्समध्ये तेजी :

आजच्या सत्रात लार्सन 2.18 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 1.77 टक्के, एशियन पेंट्स 1.01 टक्के, एनटीपीसी 0.51 टक्के, रिलायन्स 0.42 टक्के, टाटा स्टील 0.27 टक्के आणि आयटीसी 0.21 टक्के वाढीसह बंद झाले.

'या' शेअर्समध्ये घसरण :

इंडसइंड बँक 3.13 टक्के, नेस्ले 3.12 टक्के, महिंद्रा 1.73 टक्के, एसबीआय 1.70 टक्के, टीसीएस 1.53 टक्के, कोटक महिंद्रा 1.52 टक्के, एचसीएल टेक 1.49 टक्के, सन फार्मा 1.26 टक्के, एएक्सआय बँक 1.26 टक्के , इन्फोसिस 1.15 शेअर्स टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत घट :

आजच्या व्यवहारादरम्यान शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 266.90 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे गुरुवारी 268.23 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 1.33 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT