Share Market Latest Updates
Share Market Latest Updates Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 61700 च्या खाली, आयटी शेअर्समध्ये...

राहुल शेळके

Share Market Closing 17 May 2023: बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. BSE सेन्सेक्स 200 अंकांच्या घसरणीनंतर 61700 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

निफ्टीही 18200 च्या पातळीवर आला आहे. आयटी शेअर बाजारात विक्रीत आघाडीवर आहेत. NSE वर निफ्टी आयटी निर्देशांक 1.25 टक्क्यांनी घसरला आहे.

आयटी क्षेत्रात प्रचंड विक्री:

निफ्टीमध्ये HCL TECH चा शेअर 2 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. टाटा कंझ्युमर, कोटक बँक, इन्फोसिस सुद्धा 1-1 टक्क्यांनी घसरत आहेत. तर हिरो मोटोकॉर्म आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स सुमारे दीड टक्क्यांनी वाढले आहेत.

याआधी मंगळवारी बीएसई सेन्सेक्स 413 अंकांनी घसरून 61,932 वर आणि निफ्टी 112 अंकांनी घसरून 18,286 वर बंद झाला.

बाजारातील घसरणीची कारणे:

  • जागतिक बाजारातून संमिश्र संकेत

  • डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत आहे

  • हेवीवेट शेअर्समध्ये जोरदार विक्री

  • जागतिक बाजारात मंदीची भीती

गुंतवणूकदारांचे नुकसान:

आजच्या व्यवहारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 277.26 लाख कोटी रुपयांवर आले आहे, जे मंगळवारी 278.11 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 85 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

कोटक महिंद्रा बँक, अपोलो हॉस्पिटल्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, एशियन पेंट्स आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज हे बुधवारच्या व्यवहारात निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले. तर Hero MotoCorp, IndusInd Bank, ITC, UPL आणि BPCL हे निफ्टीवर हे शेअर्स तेजीत होते.

सेन्सेक्सच्या कोणत्या शेअर्समध्ये वाढ?

इंडसइंड बँक 1.10 टक्के, आयटीसी 0.87 टक्के, भारती एअरटेल 0.68 टक्के, मारुती सुझुकी 0.56 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.29 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.12 टक्के आणि एसबीआय 0.5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

कोटक महिंद्रा 1.80 टक्क्यांनी, एशियन पेंट्स 1.52 टक्क्यांनी, एचसीएल टेक 1.50 टक्क्यांनी, टीसीएस 1.47 टक्क्यांनी, इन्फोसिस 1.32 टक्क्यांनी घसरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT