share market  sakal
Share Market

Share Market Closing: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्समध्ये 234 अंकांची वाढ, 'या' शेअर्समध्ये...

BSE सेन्सेक्स 234 अंकांनी वाढून 61,963 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing 22 May 2023: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. BSE सेन्सेक्स 234 अंकांनी वाढून 61,963 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही 111 अंकांनी वाढून 18,314 वर बंद झाला आहे.

बाजाराने आज सलग दुसऱ्या दिवशी वाढ नोंदवली. बाजारातील सोमवारच्या तेजीत आयटी आणि मेटल क्षेत्रातील शेअर्स आघाडीवर होते.

Share Market Closing 22 May 2023

आयटी-मेटल शेअर्समध्ये वाढ:

NSE वरील निफ्टी आयटी आणि मेटल निर्देशांक 2-2 टक्क्यांहून अधिक तेजीसह बंद झाले आहेत. निफ्टीमध्ये अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली.

अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये जवळपास 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर अदानी पोर्ट्सचा स्टॉक 6.4 टक्क्यांनी वाढून बंद झाला. तर हिरो मोटोकॉर्पचा शेअर सर्वाधिक घसरला आहे.

याआधी शुक्रवारी भारतीय बाजारात 3 दिवसांनंतर तेजीची नोंद झाली होती. BSE सेन्सेक्स सुमारे 300 अंकांच्या वाढीसह 61,729 वर बंद झाला आणि निफ्टी 73 अंकांनी चढून 18,200 च्या वर बंद झाला.

आयटी कंपन्यांमध्ये वाढ:

आज देशांतर्गत बाजारपेठेच्या वाढीमध्ये आयटी कंपन्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. BSE सेन्सेक्स निर्देशांकातील आजच्या टॉप-5 परफॉर्मर कंपन्या या क्षेत्रातील होत्या.

टेक महिंद्रा सर्वाधिक 3.13 टक्क्यांनी वाढले, तर विप्रो 2.59 टक्के, इन्फोसिस 2.16 टक्के, टीसीएस 2.12 टक्के आणि एचसीएल टेक 1.73 टक्क्यांनी वाढले.

सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 11 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली, तर 19 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले.

इतर काही घटकांमुळे बाजारातील तेजी कमी झाली. भारतीय चलन रुपयात आज सलग चौथ्या दिवशी घसरण झाली. डॉलर कमजोर झाल्यानंतर रुपया घसरला आहे. याचा देशांतर्गत बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 16 पैशांनी घसरून 82.82 वर बंद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT