Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Closing : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी; मात्र स्मॉल कॅप शेअर्समध्ये मोठी घसरण

सेन्सेक्स 126 अंकांनी वाढून 57653 वर बंद झाला.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Closing 27 March 2023 : बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीच्या वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 126 अंकांनी वाढून 57653 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टीही 40 अंकांच्या वाढीसह 16,985 वर बंद झाला.

दिवसाच्या उत्तरार्धात वरच्या पातळीवरून बाजारात विक्री झाली. इंट्राडेमध्ये सेन्सेक्स 58,019 वर पोहोचला होता. बाजारातील तेजीत फार्मा, सरकारी बँका आणि एफएमसीजी शेअर्स आघाडीवर होते. तर रिअॅल्टी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 398 अंकांनी घसरून 57,527 वर बंद झाला. ऑटो आणि बँकिंग शेअर बाजारावर दबाव आणण्याचे काम करत आहेत.

शेअर बाजारात तेजीची कारणे :

  • जागतिक बाजारपेठेत खालच्या स्तरावरून खरेदी

  • डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत आहे

  • डॉलर निर्देशांक स्थिर, 103 च्या जवळ आहे.

  • RIL, SBI, HCL TECH सह बड्या शेअर्समध्ये तेजी

BSE India

आजच्या व्यवहारात फार्मा, एफएमसीजी, बँक, आयटी, हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी होती. त्याचबरोबर ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, वाहन आणि तेल क्षेत्राचे शेअर्स घसरले आहेत. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 28 वाढीसह आणि 22 शेअर्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समध्ये असताना 16 शेअर्स वाढले तर 14 घसरले.

गुंतवणूकदारांचे मोठेह नुकसान :

भारतीय शेअर बाजार भलेही तेजीसह बंद झाला असेल, पण स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 253.51 लाख कोटी रुपये आहे, तर शुक्रवारी ते 254.53 लाख कोटी रुपये होते. आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांना 1.02 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

'या' शेअर्समध्ये वाढ :

आज बाजारात रिलायन्सचा हिस्सा 1.54 टक्के, सन फार्मा 1.15 टक्के, मारुती सुझुकी 0.96 टक्के, एसबीआय 0.87 टक्के, कोटक महिंद्रा 0.80 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.71 टक्के, इन्फोसिस 1.6 टक्के, 1.0 टक्के हे शेअर्स वाढीसह बंद झाले.

'या' शेअर्समध्ये घसरण :

HUL 0.46 टक्के, पॉवर ग्रिड 1.10%, महिंद्रा अँड महिंद्रा 0.93%, टाटा मोटर्स 0.90%, NTPC 0.87%, बजाज फायनान्स 0.81% लार्सन 0.44 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT