Share Market Latest Updates
Share Market Latest Updates Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार सलग सातव्या दिवशी तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठी वाढ

राहुल शेळके

Share Market Closing 28th April 2023: आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला आहे. गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे सेन्सेक्सने 61,000 तर निफ्टीने 18,000 चा टप्पा ओलांडला आहे.

आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 463 अंकांच्या वाढीसह 61,112 वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजार 150 अंकांच्या उसळीसह 18,065 अंकांवर बंद झाला.

BSE India

सकाळी निफ्टी 17,950 वर उघडला आणि सेन्सेक्स 60,721 वर उघडला. याआधी गुरुवारी सलग सहाव्या दिवशी भारतीय बाजार तेजीसह बंद झाला.

निफ्टी या आठवड्यात अडीच टक्क्यांनी वधारला. या दरम्यान निफ्टीमध्ये समाविष्ट असलेल्या टाटा कंज्यूमर शेअरने 9% परतावा दिला. तर एफएमसीजी क्षेत्रातील एचयूएलचा शेअर 1.8% ने खाली आला.

शेअर बाजारातील महात्त्वाच्या घडामोडी:

  • शेअर बाजार सलग सातव्या दिवशी वधारला

  • सरकारी बँका, आयटी, भांडवली वस्तू क्षेत्रात तेजी

  • अॅक्सिस बँकेच्या निकालानंतर बँक निफ्टी दबावाखाली

  • FMCG करारानंतर रेमंड आणि GCPL घसरले

  • मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये तेजी

आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, मीडिया, इन्फ्रा, हेल्थकेअर, तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली आहे. केवळ ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील शेअर्सचे निर्देशांक घसरले.

आजच्या व्यवहारात निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 1.34 टक्क्यांनी किंवा 390 अंकांच्या वाढीसह बंद झाला. स्मॉक कॅप इंडेक्सच्या शेअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 22 वाढीसह आणि 8 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 41 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 9 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ:

शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.50 लाख कोटींहून अधिकची तेजी पाहायला मिळाली.

शुक्रवारच्या सत्रात, BSE वर सूचीबद्ध कंपनीचे बाजार भांडवल वाढून रु. 271.71 लाख कोटी झाले आहे, जे गुरुवारी रु. 269.07 लाख कोटी होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.64 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT