Share Market Latest Updates Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात पुन्हा तेजी; सेन्सेक्समध्ये 555 अंकांची वाढ, 'या' शेअर्समध्ये...

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 166 अंकांच्या तेजीसह 18,255 अंकांवर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing 4 May 2023: बँकिंग आणि NBFC शेअर्समध्ये झालेल्या जबरदस्त खरेदीमुळे भारतीय शेअर बाजार तेजीत बंद झाला आहे. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 556 अंकांच्या तेजीसह 61,749 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 166 अंकांच्या तेजीसह 18,255 अंकांवर बंद झाला. फेडने व्याजदरात वाढ केल्याने भारतीय बाजारांवर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही.

BSE India

आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, फार्मा, मेटल, एनर्जी, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, तेल क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले, तर केवळ एफएमसीजी शेअर्समध्ये घसरण झाली. स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 21 वाढीसह आणि 9 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 37 शेअर्स वधारले तर 13 शेअर्स घसरून बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ:

आजच्या व्यवहारात शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 275.16 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे बुधवारी 273.24 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.92 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

आजच्या व्यवहारात, बजाज फायनान्स 3.43%, HDFC 2.64%, HDFC बँक 2.08%, बजाज फिनसर्व्ह 2.06%, एशियन पेंट्स 1.82%, SBI 1.72%, TCS 1.26%, रिलायन्स 1.16% वाढीसह बंद झाले. तर इंडसइंड बँक 0.98 टक्क्यांनी, नेस्ले 0.76 टक्क्यांनी, टाटा मोटर्स 0.65 टक्क्यांनी, आयटीसी 0.62 टक्क्यांनी, पॉवर ग्रिड 0.40 टक्क्यांनी घसरणीसह बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या! पुणे, मुंबईसह आज राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम

Ganesh Visarjan 2025: गणेश विसर्जनाच्या दिवशी नैवेद्यात बनवा 'हे' चविष्ट हलवा, बाप्पा प्रसन्न होतील

Vijay Wadettiwar: सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक: काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार; 'ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष उभा केल्याचा आरोप'

Latest Maharashtra News Updates : अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण तूर्त स्थगित, मंत्री अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर निर्णय

Ganesh Visarjan 2025: गणपती उत्सवात नाचून पाय थकले? 'या' उपायांनी मिळवा पाय दुखण्यापासून मुक्ती

SCROLL FOR NEXT