Share Market Closing 16 June 2023: शेअर बाजार शुक्रवारी तेजीसह बंद झाला. बाजारातील प्रमुख निर्देशांक हिरव्या चिन्हात बंद झाले. BSE सेन्सेक्स 466 अंकांनी वाढून 63,384 वर बंद झाला.
निफ्टी देखील 132 अंकांनी वाढून 18,820 वर बंद झाला. याशिवाय निफ्टी एफएमसीजी निर्देशांकानेही इंट्राडेमध्ये विक्रमी उच्चांक गाठला.
बँकिंग क्षेत्रात तेजी:
बाजाराच्या जोjदार वाढीत उत्साह भरण्याचे काम बँकिंग शेअर्सनी केले. निफ्टी बँक निर्देशांक 1 टक्क्यांनी वाढून बंद झाला. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स 310 अंकांनी घसरून 62,917 वर बंद झाला.
सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी उच्चांकावर बंद झाले. मिडकॅप शेअर्स सलग पाचव्या दिवशी नवीन उच्चांकावर बंद झाले. आजच्या व्यवहारात एफएमसीजी निर्देशांक विक्रमी पातळीवर बंद झाले तर बँकिंग, फार्मा, धातू शेअर्स वधारले. तर आयटी, रियल्टी शेअर्सवर दबाव राहिला.
एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, बजाज फिनसर्व्ह, डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत. तर विप्रो, बजाज ऑटो, टीसीएस, बीपीसीएल आणि अपोलो हॉस्पिटल्सचे शेअर्स निफ्टीमध्ये घसरले.
PSU बँक सेक्टर 1 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. तर कॅपिटल गुड्स, एफएमसीजी, हेल्थकेअर निर्देशांक 0.5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
तर आयटी निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरणीसह बंद झाले. बीएसईवर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरणीसह बंद झाला.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ:
भारतीय शेअर बाजाराच्या नेत्रदीपक वाढीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर बंद झाले आहे. बाजार बंद होताना BSE चे मार्केट कॅप 292.73 लाख कोटी रुपये आहे, जे ऐतिहासिक पातळीवर आहे.
गुरुवारी BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 290.91 लाख कोटी रुपयांवर आले आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.82 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.