share market  sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 63,168 अंकांवर, स्मॉल कॅप शेअर्सचे काय झाले?

आठवड्याचा पहिला व्यवहाराचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी निराशाजनक ठरला.

राहुल शेळके

Share Market Closing 19 June 2023: आठवड्याचा पहिला व्यवहाराचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी निराशाजनक ठरला. सकाळी बाजार तेजीसह उघडल्यानंतर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक ऐतिहासिक उच्चांक गाठण्यापासून काही अंतरावरच राहिले.

आणि नंतर बाजारात प्रॉफिट बुकींग आल्यानंतर बाजार घसरला.आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 216 अंकांनी घसरून 63,168 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 71 अंकांनी घसरून 18,755 अंकांवर बंद झाला.

आजच्या व्यवहारात फक्त ऑटो, फार्मा, हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. बँकिंग, आयटी, तेल आणि वायू, एफएमसीजी, धातू, मीडिया, ऊर्जा, इन्फ्रा कंझ्युमर ड्युरेबल्स आणि कमोडिटी क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले.

स्मॉल कॅप आणि मिड कॅप क्षेत्रातील शेअर्सच्या निर्देशांकात किंचित वाढ झाली. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 15 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 35 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 11 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 19 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Closing 19 June 2023

BSE चे मार्केट कॅप घसरले:

भारतीय शेअर बाजारातील घसरणीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप खाली घसरले आहे. बाजार बंद होताना बीएसईचे मार्केट कॅप 292.58 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे.

तर मागील ट्रेडिंग सत्रात मार्केट कॅप 292.73 लाख कोटी रुपये होते. आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांची 15,000 कोटी रुपयांची संपत्ती बुडाली आहे.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, टीसीएस आणि सन फार्मा यांचे शेअर्स सेन्सेक्सवर 1-1 टक्क्यांनी तेजीसह बंद झाले. याशिवाय टायटन, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

कोटक महिंद्रा बँकेचा शेअर बीएसई सेन्सेक्सवर 1.72 टक्क्यांनी सर्वाधिक घसरून बंद झाला. त्याचप्रमाणे, अॅक्सिस बँकेचा शेअर 1.54 टक्के, NTPC चा शेअर 1.35 टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, ICICI बँकेचा शेअर 1.24 टक्के आणि भारती एअरटेलचा शेअर 1.07 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक, इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया, पॉवरग्रीड, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, टाटा मोटर्स, एसबीआय, विप्रो आणि टाटा स्टील घसरणीसह बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Robert Kiyosaki Alert: शेअर मार्केट कोसळणार; रॉबर्ट कियोसाकींचा इशारा, वॉरेन बफेंनी बदलली भूमिका

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला

Dasara 2025: कंबरेला दोरी बांधून ७७ वर्षीय पुजाऱ्याने ओढल्या बारा बैलगाड्या; बिरोबाचा पारंपारिक दसरा महोत्सव

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT