Share Market latest updates today  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी; सेन्सेक्स 63,000 पार, 'या' शेअर्समध्ये वाढ

गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक ऐतिहासिक पातळीच्या जवळ बंद झाले.

राहुल शेळके

Share Market Closing 7 June 2023: आजचे सत्र भारतीय शेअर बाजारासाठी अतिशय चांगले होते. गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक ऐतिहासिक पातळीच्या जवळ बंद झाले.

आजच्या ट्रेडिंग सत्राचा स्टार परफॉर्मर निफ्टी आहे, 2023 मध्ये प्रथमच 18,700 चा टप्पा पार केला आहे. त्यामुळे सेन्सेक्सने 63,000 चा आकडा पार केला.

आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 390 अंकांच्या वाढीसह 63,182 वर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 138 अंकांच्या तेजीसह 18,737 अंकांवर बंद झाला.

आजच्या व्यवहारात बाजारातील सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली आहे. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, रिअल इस्टेट, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली आहे.

निफ्टी स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. निफ्टीच्या मिडकॅपमध्ये 354 अंकांची तेजी होती.

Share Market Closing 7 June 2023

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ:

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत नेत्रदीपक झेप घेतली आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप वाढून रु. 289.07 लाख कोटी झाले, जे मंगळवारी रु. 286.62 लाख कोटी होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.45 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

नेस्ले इंडियाचा शेअर बीएसई सेन्सेक्सवर सर्वाधिक 2.97 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. त्याचप्रमाणे टाटा स्टीलचे शेअर्स 2.29 टक्‍क्‍यांनी, टाटा मोटर्सचे शेअर्स 2.21 टक्‍क्‍यांनी आणि भारती एअरटेलचे शेअर्स 1.70 टक्‍क्‍यांनी वाढले.

याशिवाय लार्सन अँड टुब्रो, पॉवरग्रीड, एनटीपीसी, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, टेक महिंद्रा, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, टायटन, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट आणि एशियन पेंट्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

कोटक महिंद्रा बँक, मारुती, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स सेन्सेक्सवर घसरणीसह बंद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT