Share Market Crash Sensex, Nifty close down over 1 percent each; broader markets bleed  Sakal
Share Market

Share Market Closing: बजेटपूर्वी बाजार कोसळला; सेन्सेक्स 1,053 अंकांनी घसरला; कोणते शेअर्स वधारले?

Share Market Closing: बजेटपूर्वी शेअर बाजारात जोरदार घसरण झाली. सकाळी जोरदार सुरुवात केल्यानंतर प्रमुख निर्देशांक घसरले. सेन्सेक्स 1053 अंकांनी घसरून 70,370 वर आला. निफ्टीही 333 अंकांनी घसरला आणि 21,238 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 23 January 2024: बजेटपूर्वी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सकाळी जोरदार सुरुवात झाल्यानंतर प्रमुख निर्देशांक घसरले. सेन्सेक्स 1053 अंकांनी घसरून 70,370 वर आला. निफ्टीही 333 अंकांनी घसरला आणि 21,238 वर बंद झाला. बँकिंग, धातू, रियल्टी आणि मीडिया क्षेत्रात जोरदार विक्री झाली, तर केवळ फार्मा क्षेत्रात खरेदी झाली.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. बँक निफ्टी 2.26 टक्क्यांनी किंवा 1043 अंकांनी घसरून बंद झाला. याशिवाय ऑटो, आयटी, एफएमसीजी, मेटल, मीडिया, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

केवळ हेल्थकेअर आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सही मोठ्या घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 5 शेअर्स वाढीसह तर 25 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 10 शेअर्स वाढीसह आणि 40 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

जागतिक बाजारात तेजी नसल्यामुळे बँक, तेल आणि गॅस शेअर्समध्ये घसरण झाली. मात्र, फार्मा आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी झाली. मंगळवारी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली. भांडवली बाजार नियामक सेबी 1 फेब्रुवारीपासून परदेशी गुंतवणूकदारांसाठी नियम कडक करणार आहे.

आज प्रॉफिट बुकींगमुळे रेल्वेच्या शेअर्समध्ये 16 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. यासह, म्युच्युअल फंड आणि FII ने झोमॅटोसह चार नवीन तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये त्यांचा हिस्सा वाढवला आहे.

गुंतवणूकदारांचे 8.08 लाख कोटी रुपयांचे नुकसान

बाजारातील घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांचे भांडवल झपाट्याने कमी झाले आहे. 20 जानेवारी 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 374.41 लाख कोटी रुपये होते.

आज म्हणजेच 23 जानेवारी 2024 रोजी ते 366.33 लाख कोटी रुपयांवर घसरले. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात 8.08 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

John Cena Retired : भारतीयांचा 'लाडका' जॉन सीना निवृत्त... WWE मधील शेवटच्या लढतीत दिग्गजांच्या उपस्थितीत भावूक, Video

Brown University Firing : परीक्षेवेळी गोळीबार, शेवटचा पेपर देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; ८ जण जखमी

Salman Ali Agha: वर्ल्डकप तिकीट विक्रीच्या पोस्टरवरून सलमानला वगळले; पाकिस्तान क्रिकेट मंडळ ‘आयसीसी’वर नाराज

Success Story: रोहित पालची स्पर्धा परीक्षेत उत्तुंग भरारी; राज्यात प्रथम, सहायक वनसंरक्षक पदावर होणार नियुक्ती

Latest Marathi News Live Update: व्होटचोरीच्या मुद्द्यावर कॉंग्रेसचे आज दिल्लीत आंदोलन

SCROLL FOR NEXT