Share Market Crash Sensex off lows, Nifty below 21,500; midcaps, smallcaps decline  Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरला, सेन्सेक्स 400 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Closing: आज शेअर बाजारात प्रचंड विक्री झाली. सुमारे 400 अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्स 71,150 च्या जवळ व्यवहार करत आहे. निफ्टी देखील 110 अंकांनी घसरला आहे आणि 21,450 च्या जवळ व्यवहार करत आहे.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 18 January 2024: आज शेअर बाजारात प्रचंड विक्री झाली. सुमारे 400 अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्स 71,150 च्या जवळ बंद झाला. निफ्टी देखील 110 अंकांनी घसरला आहे आणि 21,450 च्या जवळ बंद झाला. बँकिंग, मेटल आणि आयटी क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारावर दबाव आहे. LTI Mindtree आणि Asian Paints सर्वाधिक घसरले आहेत.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात ऑटो, फार्मा, रिअल इस्टेट, इन्फ्रा हेल्थकेअर आणि तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले. तर बँकिंग, आयटी, वित्तीय सेवा, एफएमसीजी, मेटल, मीडिया, ऊर्जा क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले.

सकाळी मोठी घसरण झाल्यानंतर निफ्टी मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक सपाट बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 12 शेअर्स वाढीसह आणि 18 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 22 शेअर्स वाढीसह आणि 28 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

शेअर बाजारात सन फार्मा 3 टक्क्यांच्या वाढीसह, टेक महिंद्रा 2.5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले, तर सिप्ला आणि टाटा मोटर्सचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

एलटीआय माइंड ट्रीचे शेअर्स 11 टक्क्यांनी घसरले तर एचडीएफसी बँक आणि एनटीपीसीचे शेअर्स तीन टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

कोणते शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर

शेअर बाजारात सध्या सुरू असलेल्या घसरणी दरम्यान ओरॅकल, फिलिप्स कार्बन, शोभा, वैभव ग्लोबल, ऍप्टस व्हॅल्यू हाउसिंग, अपोलो टायर्स आणि वेलस्पन कॉर्पचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. व्हीआयपी इंडस्ट्रीजचे शेअर्स 52 आठवड्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत.

अदानी समूहाच्या 10 कंपन्यांपैकी पाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली तर पाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. अदानी पॉवर 1.63 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला तर अदानी एनर्जी सोल्यूशन दोन टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

गुंतवणूकदारांचे 64,000 कोटी रुपये बुडाले

बीएसईवर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 18 जानेवारी रोजी 369.71 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे बुधवारी 17 जानेवारी रोजी 370.35 लाख कोटी रुपये होते.

अशाप्रकारे, बीएसईमध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 64 हजार कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 64 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Ambad News : अंबड तालुक्यातील लालवाडी तांडा नंबर 1 वर घडली दुर्दैवी घटना; तलावात पाय घसरून अकरा वर्षीय राजवीर राठोड याचा बुडून मृत्यू

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT