Share Market Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात विक्रमी उच्चांक असताना कोणते शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये?

Share Market Tips: काल सलग 9व्या दिवशी शेअर बाजारात तेजी होती.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: बुधवारी बाजार तेजीसह बंद झाला. निफ्टी 20,050 च्या आसपास बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 245.86 अंकांच्या किंवा 0.37 टक्क्यांच्या वाढीसह 67466.99 अंकांवर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 76.80 अंक म्हणजेच 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 20070 वर बंद झाला. इतिहासात प्रथमच निफ्टीने वीस हजारांवर बंद भाव दिला. 

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी सपाट ट्रेंडसह उघडला आणि सुमारे 70 अंकांच्या वाढीसह बंद झाला, शिवाय दिवसभर हिरव्या रंगात व्यवहार झाल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले.

डेली चार्टवर शेवटच्या ट्रेडिंग दिवसादरम्यान निफ्टी 20110 - 19914 च्या रेंजमध्ये कंसोलिडेट झाले. डेली आणि आवर्ली मोमेंटम इंडिकेटर्स वेगवेगळे संकेत देत आहेत. अशा स्थितीत शॉर्ट टर्ममध्ये बाजारात कंसोलिडेशन दिसू शकते.

या कंसोलीडेशची रेंज 20,100 - 19,800 असू शकते. या दरम्यान सेक्टर रोटेशन आणि स्टॉक विशेष मोमेंटम पाहू शकतो. एकूणच शॉर्ट टर्म आउटलूक पॉझिटीव्ह आहे.

या कंसोलिडेशनचा वापर खरेदीची संधी म्हणून करावा असा सल्लाही गेडिया देत आहेत. निफ्टीला 19865-19810 वर सपोर्ट दिसत आहे, तर 20200-20250 वर रझिस्टंस दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • ग्रासिम (GRASIM)

  • टाटा कंझ्युमर (TATACONSUM)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • टायटन (TITAN)

  • पीएनबी (PNB)

  • ऑरोफार्मा (AUROPHARMA)

  • झायडस लाईफ (ZYDUSLIFE)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

  • व्होल्टास (VOLTAS)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT