Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? काय सांगतात तज्ञ

Share Market Tips: शुक्रवारी निफ्टीमध्ये फार्मा सोडून सर्व क्षेत्रात खरेदी होती

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: शुक्रवारी बाजार वाढीसह बंद झाला. फार्मा सोडून सर्व क्षेत्रात खरेदीच्या जोरावर निफ्टी 19400 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 555.75 अंकांनी अर्थात 0.86 टक्क्यांनी वाढून 65387.16 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 181.50 अंकांनी म्हणजेच 0.94 टक्क्यांनी वाढून 19435.30 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीची सुरुवात सपाट ट्रेंडने झाल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया यांनी सांगितले. मात्र शुक्रवारी दिवसभर खरेदीची लगबग पाहायला मिळाली. त्यामुळे निफ्टी जवळपास 180 अंकांच्या वाढीसह बंद झाला.

डेली चार्टवर, निफ्टीने 19250 च्या झोनमधून जोरदार पुनरागमन केले आहे. डेली आणि आवर्ली मोमेंटम इंडिकेटर्सने डायव्हर्जंससह पॉझिटीव्ह क्रॉसओव्हरला सुरुवात केली आहे आणि शॉर्ट टर्ममध्ये निफ्टीमध्ये आणखी तेजीचे संकेत आहे.

विकली चार्टवर, निफ्टी सलग पाच आठवडे घसरल्यानंतर हिरव्या रंगात बंद झाला. याचा अर्थ इंडेक्स त्या झोनपर्यंत पोहोचला आहे जिथून पुन्हा खरेदी होऊ शकते. अशा परिस्थितीत शॉर्ट टर्ममध्ये निफ्टीत वाढ दिसून येईल. वरच्या बाजूला, निफ्टी 19650 च्या दिशेने जाताना दिसू शकतो. यासाठी 19330 - 19300 वर सपोर्ट आहे. तर, 19520-19550 वर रझिस्टंस दिसून येतो.

बँक निफ्टीनेही शुक्रवारी जोरदार पुनरागमन केले आहे. त्याने 44144 वरील त्याच्या 20-आठवड्यांच्या मूव्हिंग सरासरीचा सपोर्ट कायम ठेवला आणि तो हिरव्या रंगात बंद झाला.

पुलबॅक पुढील आठवड्यातही सुरू राहण्याची आशा आहे. डेली आणि आवर्ली मोमेंटम इंडिकेटर्समध्ये एक सकारात्मक क्रॉसओव्हरही आहे जो एक खरेदीचा सिग्नल आहे. बँक निफ्टी शॉर्ट टर्ममध्ये 45000 चा स्तर गाठताना दिसेल अशी अपेक्षा आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • एनटीपीसी (NTPC)

  • जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (JIOFIN)

  • ओएनजीसी (ONGC)

  • जेएसडब्ल्यू (JSWSTEEL)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • पीएनबी (PNB)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT