Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? काय आहे तज्ञांचा सल्ला?

Share Market Tips: तीन दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर आठवड्याचे शेवटचे ट्रेडिंग सत्र तेजीसह बंद झाले.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: शुक्रवारी सलग तीन दिवसांच्या घसरणीतून सावरत, बेंचमार्क इंडेक्स वाढीसह बंद झाले. निफ्टी 19500 च्या वर बंद होण्यात यशस्वी झाला.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 480.57 अंकांनी म्हणजेच 0.74 टक्क्यांनी वाढून 65721.25 वर बंद झाला आणि निफ्टी 135.30 अंकांनी किंवा 0.70 टक्क्यांनी वाढून 19517 वर बंद झाला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स प्रत्येकी 0.6 टक्क्यांनी वाढले.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

घसरणीनंतर बाजाराला शुक्रवारी दिलासा मिळाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. बाजारात 0.50 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली.

वाढीसह उघडल्यानंतर, निफ्टी संपूर्ण ट्रेडिंग सत्रात एका रेंजमध्ये गेला आणि शेवटी 19518 च्या पातळीवर बंद झाला. आयटी, फार्मा आणि बँकिंगने चांगली कामगिरी केली. ब्रॉडर मार्केटमध्येही तेजी होती.

निफ्टी 19300 सपोर्टमधून रिकव्हर झाला, पण शॉर्ट टर्म मूव्हिंग एव्हरेज म्हणजेच 20 इएमएवर जाण्यास अयशस्वी झाला. पुढील रिकव्हरीसाठी स्थिरता आवश्यक आहे.

असे न झाल्यास पुन्हा घसरण सुरू होईल. पण जागतिक इंडेक्समध्येही घसरण होते आहे. पण त्यांचा तेजीचा कल कायम आहे, त्यामुळे काहीसा दिलासा आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • सिप्ला (CIPLA)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • विप्रो (WIPRO)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • एमआरएफ (MRF)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • फेडरल बँक (FEDERALBNK)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT