Share Market  sakal
Share Market

Share Market Today: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये?

Share Market Tips: सोमवारी सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद झाले.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: सोमवारी सेन्सेक्स-निफ्टी वाढीसह बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी झाली. मात्र, निफ्टी बँक फ्लॅट बंद झाली. फार्मा आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.

रिऍल्टी आणि ऑटो इंडेक्स किरकोळ वाढीसह बंद झाले. त्याचबरोबर पॉवर, मेटल आणि बँकिंग शेअर्सवर दबाव दिसून आला. व्यवहाराच्या अखेरीस सेन्सेक्स 232 अंकांनी वाढून 65953 वर बंद झाला.

त्याच वेळी, निफ्टी 80 अंकांनी वाढून 19597 वर बंद झाला. तर निफ्टी बँक 42 अंकांनी घसरून 44838 वर बंद झाला. तर मिडकॅप 194 अंकांनी वाढून 37824 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

आशियाई बाजारातील वाढीमुळे इथल्या बाजारांना सपोर्ट मिळाला पण युरोपीय बाजारातील कमजोरीमुळे देशांतर्गत बाजारातील वाढ मर्यादित झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले.

या आठवड्यात आरबीआयच्या आगामी चलनविषयक धोरणाच्या घोषणेपूर्वी, बाजारात संमिश्र ट्रेंडसह रेंजबाउंड व्यापार होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी येणारे सीपीआय आणि आयआयपीचे आकडेही महत्त्वाचे आहेत, त्यावर बाजाराची नजर असेल.

तांत्रिकदृष्ट्या, व्यापारी 19500 लेव्हलकडे सपोर्ट म्हणून पाहत आहेत. जर निफ्टी याच्या वर टिकून राहिला तर तो 19650 किंवा 20 दिवसांच्या एसएमएपर्यंत जाऊ शकतो.

बाजारात आणखी तेजी आली तर निफ्टी 19725 पर्यंत जाऊ शकतो. दुसरीकडे, 19500 च्या खाली घसरल्याने तेजीचा कल कमकुवत होईल आणि इंडेक्स पुन्हा 19450-19425 च्या पातळीला स्पर्श करताना दिसू शकते.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • डिव्हिस लॅब (DIVISLAB)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • सनफार्मा (SUNPHARMA)

  • एलटीआय माईंडट्री (LTIM)

  • ऑरोफार्मा (AUROPHARMA)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT