Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजार सुरु झाल्यानंतर कोणते 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये?

Share Market Today: काल सर्वात मोठी घसरण बँकिंग इंडेक्समध्ये झाली.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: बुधवारी बाजारात घसरण दिसून आली. निफ्टी 19700 च्या खाली बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 551.07 अंक अर्थात 0.83 टक्क्यांनी घसरून 65,877.02 वर आणि निफ्टी 140.40 अंक म्हणजेच 0.71 टक्क्यांनी घसरून 19,671.10 वर आला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

19850 च्या आसपास रझिस्टंसचा सामना केल्यानंतर बाजारात करेक्शन दिसून आल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 140.40 अंकांच्या घसरणीसह 19,671.10 वर बंद झाला.

दिवसाचा शेवट फक्त फार्मा सेक्टरने वाढीसह केला. इतर सर्व सेक्टर्स लाल रंगात बंद झाले. सर्वात मोठी घसरण बँकिंग इंडेक्समध्ये झाली.

बुधवारी मोठ्या शेअर्ससोबतच छोट्या आणि मध्यम शेअर्सवरही दबाव होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.90 टक्के आणि 0.34 टक्क्यांची घसरण झाली. निफ्टी 50 इंडेक्सने केवळ डेली चार्टवर बियरीश कँडल तयार केली आहे.

शिवाय वाढत्या ट्रेंडलाइनवरून ब्रेकडाउनही दिला गेला आहे, जे बाजारातील शॉर्ट टर्म कमजोरीचे संकेत आहे. येत्या काही दिवसांत निफ्टी 19800 च्या वर बंद झाला, तर हा ब्रेकडाउन हा सौम्य धक्का मानला जाऊ शकतो. निफ्टीला 19580 वर तात्काळ सपोर्ट आहे. तर 19780 वर रझिस्टंस आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • एनटीपीसी (NTPC)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • पीएफसी (PFC)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • पॉलीकॅब (POLYCAB)

  • पेज इंडिया (PAGEIND)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: सांगली जिल्ह्यातील विटा नगरपालिकेत ५० वर्षांनंतर ऐतिहासिक सत्तांतर

Nagar Palika Election Result : सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांनी केला करेक्ट कार्यक्रम, एक हाती सत्ता आणत भाजपला दिला झटका

'मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर...' अपघातानंतर नोरा फतेहीची पहिली प्रतिक्रिया, आता कशी आहे तब्येत?

Kankavli Nagar Panchayat Election Result : कणकवलीत नितेश राणेंना जबरदस्त धक्का! नगराध्यक्षपद गेलं; शहरविकास आघाडीचा विजय

Navi Mumbai Crime: धावत्या लोकलमधून तरुणीला ढकलले, माथेफिरू व्यक्तीचे कृत्य; पनवेल स्थानकातील प्रकार

SCROLL FOR NEXT