Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today bpcl Power Grid Coal India 18 October 2023 know details  Sakal
Share Market

Share Market Today: आज शेअर बाजाराचा कसा असेल मूड? कोणते शेअर्स मिळवून देतील नफा?

Share Market Today: मंगळवारी बाजारात तेजी दिसून आली.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: मंगळवारी बाजारात तेजी दिसून आली. चांगले जागतिक संकेत आणि बँकिंग शेअर्सचे चांगले परिणाम यामुळे बाजाराचा मूड सुधारला. या वाढीमुळे सेन्सेक्स 261 अंकांच्या वाढीसह बंद झाला. तर निफ्टी 19800 च्या पुढे बंद होण्यात यशस्वी झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 261.16 अंकांनी अर्थात 0.39 टक्क्यांनी वाढून 66428.09 वर आणि निफ्टी 79.70 अंकांनी म्हणजेच 0.40 टक्क्यांनी वाढून 19811.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

डेली चार्टवर निफ्टीने वरच्या दिशेने बार पॅटर्न मोडला, जे तेजीचे संकेत चिन्ह असल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. डेली आणि आवर्ली मोमेंटम इंडिकेटरमध्ये पॉझिटीव्ह क्रॉसओव्हर आहे जे घसरणीवर खरेदी केली पाहिजे असे सांगतात. वरच्या बाजुला निफ्टी 19883 आणि नंतर 20030 च्या दिशेने जाण्यास तयार दिसत आहे. खाली 19770 - 19750 वर सपोर्ट दिसत आहे.

बँक निफ्टीची सुरुवात नफ्याने झाली, तरीही नफ्याचा फायदा घेण्यात तो यशस्वी झाला नाही. त्यात इंट्राडे करेक्शन दिसून आले. या घसरणीमुळे 44350 - 44300 च्या झोनमध्ये खरेदी दिसून आली. आवर्ली मूव्हिंग एव्हरेजने निफ्टी बँकेला सपोर्ट म्हणून काम केले. शॉर्ट टर्ममध्ये, बँक निफ्टीमध्ये 45000 च्या दिशेने एक पुलबॅक दिसू शकतो. त्याच वेळी, कोणत्याही घसरणीच्या बाबतीत, त्यासाठी 44100-44000 वर सपोर्ट दिसू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बीपीसीएल (BPCL)

  • पॉवर ग्रीड (POWERGRID)

  • कल इंडिया (COALINDIA)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (HDFCAMC)

  • एमआरएफ (MRF)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT