Share Market Sakal
Share Market

Share Market Tips :बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये? जाणून घ्या

निफ्टी सलग पाचव्या दिवशी घसरणीवर बंद झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Investment Tips : गुरुवारी फेब्रुवारी एक्स्पायरीच्या दिवशी बाजार अस्थिर राहिला. निफ्टी सलग पाचव्या दिवशी घसरणीवर बंद झाला आहे. सेन्सेक्स 139 अंकांनी घसरून 59606 वर बंद झाला.

त्याच वेळी, निफ्टी 43 अंकांनी घसरला आणि 17511 वर बंद झाला. रियल्टी, एनर्जी आणि इन्फ्रा शेअर्समध्येही घसरण झाली. निफ्टी बँक खालच्या पातळीवरून सावरला आणि बंद झाली. निफ्टी बँक 6 अंकांनी वाढून 40002 वर बंद झाला.

मिडकॅप 45 अंकांनी घसरून 30166 वर बंद झाला. रियल्टी, एनर्जी, इन्फ्रा शेअर्स घसरले. फार्मा शेअर्सवर दबाव दिसून आला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

गुरुवारी निफ्टीमध्ये मोठी वाढ झाल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. निफ्टी दिवसभरात सकाळच्या नीचांकी 17455 च्या वर राहण्यात यशस्वी झाला. पुढे जाऊन, 17455 ची ही पातळी निफ्टीला पहिला सपोर्ट दिसत आहे.

जर निफ्टी 17450 च्या खाली घसरला तर त्यात आणखी घसरण होऊ शकते. या स्थितीत निफ्टी 17200-17150 च्या दिशेने जाताना दिसतो. जर निफ्टी 17450 च्या वर टिकून राहिला तर त्यात 17750-17850 ची पातळी पाहू शकतो.

5 दिवसांच्या विक्रीनंतर बँक निफ्टीमध्ये खालच्या स्तरावरून काही खरेदी दिसल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. शिवाय एक लाँग लेग्ड डोजी कँडल तयार केली.

जर बँक निफ्टी या नीचांकी पातळीवर टिकून राहिल्यास त्यात आणखी रिकव्हरी दिसू शकते आणि 40500 च्या दिशेने जाताना दिसू शकते.

बँक निफ्टीला पहिला रझिस्टंस 40200 स्तरावर दिसत आहे. जर बँक निफ्टीने हा रझिस्टंस पार केला, तर त्यात आणखी रिकव्हरी दिसू शकते. खाली बँक निफ्टीला 39500 वर सपोर्ट दिसत आहे. जर हा सपोर्ट तुटला तर विक्रीचा दबाव आणखी वाढू शकतो.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)

  • एल अँड टी (LT)

  • टायटन (TITAN)

  • डिव्हीस लॅब (DIVISLAB)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • ट्रेंट (TRENT)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT