Share Market  Sakal
Share Market

Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

बुधवारी निफ्टी पुन्हा वाढीसह बंद झाला.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: बुधवारी निफ्टी पुन्हा वाढीसह बंद झाला. गेल्या वर्षी डिसेंबरनंतर पहिल्यांदाच निफ्टी 18,300 च्या वर बंद झाला. बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, ऑटो, एफएमसीजी आणि ऑइल अँड गॅस शेअर्सने बाजाराला साथ दिली. इंडेक्स 18,300 च्या वर उघडला.

पण सुरुवातीच्या तासांमध्ये त्याने सर्व नफा गमावला. त्यानंतर तो 18,212 या दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. चढ-उताराच्या दरम्यान इंडेक्सने चांगले रिकव्हर केले.

बाजाराच्या शेवटी तो 18,315 वर बंद झाला. गेल्या वर्षी 20 डिसेंबरनंतरची ही सर्वोच्च बंद पातळी आहे, जी 49 अंकांनी जास्त आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीने डेली चार्टवर ड्रॅगनफ्लाय डोजी पॅटर्न तयार केला आहे कारण तो ओपनिंग लेव्हलच्या जवळ बंद झाला आहे. बुधवारी 18,000 च्या पातळीवर सपोर्ट घेतला.

आता निफ्टीचा सपोर्ट 18,200 च्या वर सरकताना दिसत आहे. येत्या सत्रांमध्ये इंडेक्स असाच टिकून राहिल्यास तो 18,500 च्या वर जाऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

बँक निफ्टी 43,000 अंकावर आहे. तो 133 अंकांनी वाढून 43,331 वर बंद झाला. याआधी, तो दिवसभरातील उच्चांक 43,384 आणि 42,822 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. इंडेक्सने डेली स्केलवर लाँग लोअर शॅडोसह एक लहान बुलिश कँडल तयार केली.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

1. इंडसइंड बँक (INDUSINDBK)
2. एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)
3. पॉवरग्रीड (POWERGRID)
4. टाटा मोटर्स (TATAMOTORS)
5. बीपीसीएल (BPCL)
6. बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
7. ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)
8. भारतीय कंटेनर निगम (CONCOR)
9. कमिन्स इंडिया (CUMMINSIND)
10. अशोक लेलँड (ASHOKLEY)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladeshi Migrants : राज्यात बांग्लादेशी घुसखोरांना बसणार आळा, सरकारने उचलले मोठे पाऊल

Virat Kohli चे फ्युचर २०१६ मध्येच सांगितले गेले होते... आता खरं ठरतंय; वाचा निवृत्तीबद्दल पुढचं भविष्य काय सांगत

Crime: झाडाला बांधले, कपडे फाडले अन् बेदम मारहाण... भावासह प्रसिद्ध गायिकेसोबत अमानुष कृत्य, धक्कादायक कारण समोर

Satara Female Doctor : ती बीडची आहे म्हणून जर... धनंजय मुंडे साताऱ्यातील महिला डॉक्टर प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?

Local Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक; कधी अन् कुठे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT