Share Market  Sakal
Share Market

Share Market Tips: आठवड्याच्या पहिल्या दिवशी कसा असेल शेअर बाजाराचा मूड? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

भारतीय बाजारात शुक्रवारी घसरण पाहायला मिळाली.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: भारतीय बाजारात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. कॅपिटल गुड्स आणि पॉवर वगळता जवळपास सर्वच क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 223.01 अंकांनी अर्थात 0.35 टक्क्यांनी घसरून 62625.63 वर बंद झाला आणि निफ्टी 71.10 अंकांनी म्हणजेच 0.38 टक्क्यांनी घसरून 18563.40 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

युरोपीय आणि आशियाई बाजारातून चांगले संकेत असूनही भारतीय बाजार शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी कमजोर राहिल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले.

आरबीआयच्या आर्थिक धोरणामुळे भारताच्या बाजारात तेजी आली. आता आरबीआयचा निर्णय अपेक्षेप्रमाणे आल्याने गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुक करायला सुरुवात केली आहे.

शॉर्ट टर्ममध्ये बाजार अस्थिर राहू शकतो असा अंदाज आहे. आता बाजाराचे लक्ष पुढील आठवड्याच्या यूएस एफओएमसी बैठकीकडे असेल.

तांत्रिकदृष्ट्या निफ्टीला 18775 च्या जवळ रझिस्टंसचा सामना करावा लागला. विकली चार्टवर, इंडेक्सने हॅमर कँडलस्टिक फॉर्मेशन तयार केले आहे जे सध्याच्या पातळीपासून आणखी कमजोरी दाखवत आहे.

जोपर्यंत इंडेक्स 18675 च्या खाली व्यापार करत आहे तोपर्यंत मंदीची भावना कायम राहण्याची शक्यता आहे. याच्या खाली गेल्यावर, तो 20 दिवसांच्या एसएमएपर्यंत खाली जाऊ शकतो.

ज्यामुळे इंडेक्स 18350 पर्यंत ड्रॅग होऊ शकतो. दुसरीकडे, 18675 पातळी ओलांडल्यानंतर तेजीची शक्यता आहे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

  • डिव्हिस लॅब (DIVISLAB)

  • आयशर मोटर्स (EICHERMOT)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पहिली भेट पोलीस भरतीत, नंतर एकाच ठिकाणी पोस्टिंग अन् वाढली जवळीक; आता पुण्यातील दोन महिला पोलीस करणार लग्न

Pune Katraj Ghat: कात्रज घाटात भाजपचे प्रचार साहित्य कचऱ्यात; झेंडे, टोप्या आणि मोदींच्या फोटोचे टीशर्ट आढळल्याने खळबळ

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Marathi News Live Updates : भविष्यात अशी कोणतीही घटना घडणार नाही, याची आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे - शायना एनसी

Phulambri News: आमदार होताच पहिल्याच निवेदनात मोठी मागणी; फुलंब्रीत छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार?

SCROLL FOR NEXT