Share Market Sakal
Share Market

Share Market Tips: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कसा असेल शेअर बाजाराचा मूड? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

गुरुवारी सर्वाधिक विक्री फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये पाहायला मिळाली

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: विकली एक्सपायरीच्या दिवशी काल भारतीय शेअर बाजाराचा मूड कन्सॉलिडेशन फेजमध्ये पाहायला मिळाला. बाजार काहीशा घसरणीसह लाल चिन्हावर बंद झाला. सेन्सेक्स 36 अंकांनी घसरून 61905 वर बंद झाला. तर दुरीकडे निफ्टी 18 अंक घसरून 18297 वर बंद झाला.

निफ्टी बँक तब्बल 144 अंक वधारून 43,475 वर बंद झालेला पाहायला मिळाला. सोबतच निफ्टी मिडकॅप इंडेक्स 96 अंकांनी वाढून 32601 वर बंद झालेला पाहायला मिळाला. गुरुवारी सर्वाधिक विक्री फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये पाहायला मिळाली तर दुसरीकडे रिऍलिटी, एफएमसीजी, कन्झ्युमर ड्युरेबलमध्येही वाढ झालेली पाहायला मिळाली. 

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

चॉईस ब्रोकिंगचे इक्विटी रिसर्च अनॅलिस्ट अमेय रणदिवे यांच्यामते भारतीय बाजारातील निर्देशांकांनी प्रचंड चढ उतारासह व्यवहार केले. दिवसाच्या शेवटी निफ्टी 18300 च्या अगदी जवळ बंद झाला. काल चौथ्या दिवशी बाजार 18200 च्या वर बंद झाला.

त्यामुळे ही निफ्टीची लेव्हल शॉर्ट टर्मसाठी एक मजबूत सपोर्ट म्हणून काम करेल. निफ्टी 18200 च्या खाली जाईपर्यंत बाजारातील तेजी कायम राहील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. अशा मार्केटमध्ये डिप्सवर खरेदी करणे आणि 18200 वर स्टॉपलॉस ठेवणे ही एक चांगली रणनीती असेल असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • ADANIENT (अदानी इंटरप्रायझेस)

  • ASIANPAINT (एशियन पेंट्स)

  • HINDUNILVR (हिंदुस्थान युनिलिव्हर)

  • ADANIPORTS (अदानी पोर्ट्स)

  • NTPC (एनटीपीसी)

  • TRENT (ट्रेंट)

  • AUBANK (एयू बँक )

  • IDFCFIRSTB (आयडीएफसी फर्स्ट बँक )

  • BANDHANBNK (बंधन बँक )

  • VOLTAS (व्होल्टास)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manjari Railway Accident : पुणे-दौंड डेमूच्या धडकेत तीन तरुण जागीच ठार; हडपसर पोलिसांकडून कसून तपास सुरू

Solapur Crime:'बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतून दोघांनी केला चेक लंपास'; पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा..

चोर-पोलिसांचा जुना खेळ संपला !; 'चोरट्यांचा फोन पे, गुगल पेवरून संवाद'; पोलिसांना सापडू नये म्हणून नवी शक्कल?

Latest Marathi Breaking News : नंदुरबारमध्ये शिंदेंना भाजपचा दे धक्का, एकनिष्ठ शिवसैनिकाचा शिवसेनेला रामराम

Pune ATS : एटीएसच्या तपासात झुबेरचे दहशतवादी मनसुबे उघडकीस; सुरक्षा यंत्रणेत खळबळ

SCROLL FOR NEXT