Share Market  Sakal
Share Market

Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

मंगळवारी बाजारात सलग दोन दिवसांच्या वाढीला ब्रेक लागला.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: मंगळवारी बाजारात सलग दोन दिवसांच्या वाढीला ब्रेक लागला. निफ्टी 18300 च्या खाली घसरला. ऑटो, फार्मा आणि बँकिंग शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजारात वातावरण खराब झाला.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 413.24 अंकांनी अर्थात 0.66 टक्क्यांनी घसरून 61,932.47 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 112.30 अंकांनी म्हणजेच 0.61 टक्क्यांनी घसरून 18286.50 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बाजार दीर्घ रॅलीनंतर मंदीच्या मूडमध्ये असल्याचे दिसून आल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. वरच्या पातळीवर प्रॉफीट बुकींग झाल्यामुळे सेन्सेक्स 62000 अंकांच्या खाली घसरला.

एफआयआयची चांगली खरेदी आणि चांगल्या देशांतर्गत मॅक्रो डेटामुळे बाजारात गेल्या काही आठवड्यात तेजी पाहायला मिळाली. पण व्याजदरांवरील जागतिक अनिश्चितता आणि मंदावलेली मागणी यामुळे गुंतवणूकदार प्रॉफीट बुक करत राहतील.

तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास डेली चार्टवर रिव्हर्सल फॉर्मेशन आणि बियरीश कँडल नजीकच्या काळात प्रॉफीट बुकिंग सुरू राहण्याची शक्यता राहिल असे संकेत देत आहेत.

निफ्टीला 18400 वर रझिस्टंसचा सामना करावा लागू शकतो. याच्या खाली, इंडेक्स पुन्हा 18200 च्या लेव्हलची टेस्ट घेऊ शकतो. ही घसरण 18150 पर्यंत वाढू शकते. दुसरीकडे, जर निफ्टीने 18400 चा रझिस्टंस पार केला तर ही तेजी 18450-18475 पर्यंत वाढलेली दिसून येईल.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • कोटक बँक (KOTAKBANK)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • मारुती (MARUTI)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • ट्रेंट (TRENT)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • व्होल्टास (VOLTAS)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT