Share Market  Sakal
Share Market

Share Market Investment Tips: बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

Share Market Investment Tips: मंगळवारी बाजार पुन्हा वाढीसह बंद झाला.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: मंगळवारी बाजार पुन्हा वाढीसह बंद झाला. पॉवर, पीएसयू बँक ऑइल अँड गॅस शेअर्समधील खरेदीच्या आधारावर बाजारात तेजी दिसून आली.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 74.61 अंकांच्या म्हणजेच 0.12 टक्क्यांच्या वाढीसह 60130.71 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 26 अंकांच्या म्हणजेच 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 17769.30 च्या पातळीवर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

नकारात्मक ग्लोबल सेंटीमेंटमुळे भारतीय बाजारांमध्येही सकारात्मक ट्रेंडसह सावधानता दिसून आल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. ट्रेडर्सनी मेटल, ऑईल-गॅस आणि फायनांशियल शेअर्सवर फोकस केला.

बाजारासाठी चिंतेची बाब म्हणजे अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये दर वाढतच राहू शकतात. यामुळे भविष्यात जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये मंदी येऊ शकते आणि विकासाला फटका बसू शकतो.

डेली चार्टवर, निफ्टीने एक छोटी डोजी कॅंडलस्टिक तयार केली आहे. आता जर निफ्टी 17720 च्या खाली घसरला तर तो परत 17670-17625 वर येऊ शकतो. दुसरीकडे, निफ्टीने 17820 चा रझिस्टंस तोडला तर ही तेजी 17900-17925 पर्यंत जाऊ शकते.

निफ्टी फ्लॅट उघडला त्यानंतर त्यात कंसोलिडेशन दिसल्याचे शेअर खानचे जतिन गेडिया म्हणतात. व्यवहाराच्या शेवटी, तो 26 अंकांच्या वाढीसह हिरव्या रंगात बंद झाला.

17620-17600 वर निफ्टीला चांगला सपोर्ट आहे. जर निफ्टी याच्या वर राहण्यात यशस्वी झाला तर अपट्रेंड चालू राहील.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • ब्रिटानिया (BRITANNIA)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • भारती एअरटेल (BHARTIARTL)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

Fake Pesticide : बनावट कृषी निविष्ठा विक्री प्रकरणी वणी पोलिसांची कारवाई; दोन आरोपींवर गुन्हा दाखल

Akola News : अकोल्यात फटाका सेंटरला आग, अग्निशमनची एनओसी न घेताच फटाक्यांची विक्री, महापालिका बजावणार नोटीस

Latest Marathi News Live Update : आज राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Deglur Temple Theft : देगलूर तालुक्यातील वझर येथील भवानी मंदिरातील दानपेटी व दागिन्यांची चोरी; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT