Share Market Tips Sakal
Share Market

Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

वित्त विधेयक 2023 शुक्रवारी लोकसभेत 64 अधिकृत सुधारणांसह मंजूर करण्यात आले त्याचा बाजारावर परिणाम झालेला दिसतो.

सकाळ डिजिटल टीम

Share Market Investment Tips : शुक्रवारी बेंचमार्क इंडेक्स लाल चिन्हात बंद झाले. निफ्टी 17000 च्या खाली बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 398.18 अंकांनी म्हणजेच 0.69 टक्क्यांनी घसरून 57527.10 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 131.90 अंकांच्या म्हणजेच 0.77 टक्क्यांच्या घसरणीसह 16945 च्या पातळीवर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बँक निफ्टी शुक्रवारी तोट्यासह बंद झाला. जोपर्यंत बँक निफ्टी 40000 ची पातळी ओलांडून ताकद दाखवत नाही तोपर्यंत वरच्या बाजूने विक्रीचा कल राहील. (Share Market Investment Tips Which 10 shares will be perform today 27 March 2023 before the market opens know details)

खालच्या बाजूने, निफ्टीला 39000 वर सपोर्ट आहे. जर हा सपोर्ट तुटला तर ही घसरण आणखी खोल होऊ शकते. मोमेंटम इंडिकेटर आरएसआयही बियरीश झोनमध्ये दिसत आहे.

वित्त विधेयक 2023 शुक्रवारी लोकसभेत 64 अधिकृत सुधारणांसह मंजूर करण्यात आल्याचे एसएएस ऑनलाइनचे संस्थापक आणि सीईओ श्रेय जैन म्हणाले.

या सुधारणांनुसार, वित्त विक्रीवरील एसटीटी (एक कर) 1 कोटी टर्नओव्हरसाठी 1700 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात आला आहे. सरकारचा हा निर्णय बाजाराला आवडला नाही, त्यामुळे शेवटच्या व्यवहारात विक्रीचा दबाव आणखी वाढला.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • झिंदाल स्टील (JINDALSTEL)

  • ट्रेंट (TRENT)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT